Cricket Buzz»फोटो गॅलरी »वानखेडेवर वादळ आणणाऱ्या यशस्वी जैस्वालचा नेट वर्थ 'छप्परफाड'! जाणून घ्या कमावतो कितीवानखेडेवर वादळ आणणाऱ्या यशस्वी जैस्वालचा नेट वर्थ 'छप्परफाड'! जाणून घ्या कमावतो किती By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 7:13 PMOpen in App1 / 7 यशस्वीने IPL च्या १०००व्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध शानदार शतक झळकावले. त्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. तंबूत रात्र काढणाऱ्या यशस्वीने मुंबईच्या रस्त्यावर पाणीपूरीही विकली. 2 / 7यशस्वी जैस्वाल ही उत्तर प्रदेशातील भदोही येथील रहिवासी आहे. क्रिकेटसाठी तो तरुण वयात मुंबईत आला. यशस्वीला मुंबईत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमलालागून असलेल्या आझाद मैदानावर त्याने अनेक रात्री तंबूत काढल्या. एवढेच नाही तर पोटासाठी त्याने पाणीपूरीही विकली. 3 / 7डावखुरा फलंदाज यशस्वी भूतकाळाच्या तुलनेत आज चांगले आयुष्य जगत आहे. नॉलेज डॉट कॉम या वेबसाइटनुसार, यशस्वीची एकूण संपत्ती १२ कोटी रुपये आहे. यशस्वी जैस्वालचा पगार ४ कोटींहून अधिक तर मासिक उत्पन्न ३५ लाखांपेक्षा जास्त आहे. ही कमाई त्याची क्रिकेट आणि जाहिरातीतून होते. 4 / 7२०२० मध्ये यशस्वीने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी पदार्पण केले. राजस्थानने २.४० कोटींना यशस्वीला सामील केले. राजस्थान रॉयल्सने २०२२ मध्ये यशस्वीच्या पगारात वाढ केली. या फ्रँचायझीने या प्रतिभावान खेळाडूला ४ कोटींमध्ये कायम ठेवले. 5 / 7यशस्वीने आयपीएलच्या १५ व्या हंगामापर्यंत आयपीएलमधून ८.८० कोटी कमावले होते. या वर्षी म्हणजेच २०२३ मध्येही राजस्थान रॉयल्स त्याला ४ कोटी रुपये देणार आहे. मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या यशस्वीला जाहिरातीतून सुमारे एक कोटी रुपयेही मिळतात. प्रथम श्रेणी क्रिकेटमधून त्याने सुमारे २० लाखांची कमाई केली आहे. 6 / 7यशस्वी जैस्वालचे भदोही येथे आलिशान घर आहे, जे त्याने २८ डिसेंबर २००१ रोजी खरेदी केले होते. यशस्वीकडे मर्सिडीज एसयूव्ही आहे. 7 / 7मुंबईविरुद्ध शतक झळकावल्यानंतर यशस्वीने जुने दिवस आठवले आणि सांगितले की, एकेकाळी आयपीएलमध्ये खेळण्याचे त्याचे स्वप्न होते. जेव्हा तो आझाद मैदानावर सराव करत असे तेव्हा वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्याचे आवाज ऐकू यायचे. मग कधी संधी मिळेल याचा विचार करायचो. आणखी वाचा Subscribe to Notifications