Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL 2023: मॅच खेळू नये यासाठी भारतीय क्रिकेटपटूचे झालेले अपहरण, बोटं छाटण्याची धमकी; मोठा गौप्यस्फोटIPL 2023: मॅच खेळू नये यासाठी भारतीय क्रिकेटपटूचे झालेले अपहरण, बोटं छाटण्याची धमकी; मोठा गौप्यस्फोट By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 5:23 PMOpen in App1 / 5भारताच्या यशस्वी फिरकीपटूंपैकी एक आर अश्विन याची ही स्टोरी आहे... बुधवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सला दणदणीत विजय मिळवून दिला. अश्विनने बॉल आणि बॅटने अप्रतिम कामगिरी करत संघाला आयपीएल २०२३ मधील तिसरा विजय मिळवून दिला.2 / 5आर अश्विनने २२ चेंडूत ३० धावांचे योगदान दिले, तर गोलंदाजीत ४ षटकांत २१ धावा देत २ बळी घेतले. अश्विनच्या या कामगिरीच्या जोरावर राजस्थानने चेपॉकमध्ये २००८ नंतर पहिल्यांदाच चेन्नईचा पराभव केला. 3 / 5ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स शोमध्ये अश्विनने खुलासा केला होता की, तो १४-१५ वर्षांचा असताना काही मुलांनी त्याचे अपहरण केले होते. 4 / 5त्याने सांगितले की, तो टेनिस क्रिकेटच्या अंतिम सामन्यासाठी जात होता. मला घेण्यासाठी दोन मुले दुचाकीवरून घरी आली. मी त्याच्यांसोबत निघालो. मला वाटले की ही मुले मॅचसाठी घेऊन जायला आली आहेत, परंतु त्यांनी मला चहाच्या दुकानात घेऊन गेले.5 / 5यानंतर त्यांनी अश्विनला सामना खेळण्यापासून रोखत असल्याचे सांगितले. अश्विनने अंतिम सामना खेळू नये असे त्यांना वाटत होते. अश्विनला त्या दोन मुलांनी त्याची बोटे छाटण्याची धमकीही दिली होती. अश्विनला ती मॅच खेळता आली नाही आणि मुलांनी त्याला सोडून दिले. आणखी वाचा Subscribe to Notifications