Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL 2023: शार्दूल, शाहरुख सोडा, सामना पाहायला आलेल्या 'या' तरुणीची रंगली चर्चा; तुम्ही ओळखलं ना?IPL 2023: शार्दूल, शाहरुख सोडा, सामना पाहायला आलेल्या 'या' तरुणीची रंगली चर्चा; तुम्ही ओळखलं ना? By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 8:13 AMOpen in App1 / 11 कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) नाट्यमय ठरलेल्या लढतीत तब्बल ८१ धावांनी विजय मिळवत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (आरसीबी) हातातून सामना खेचून आणला. 2 / 11प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर कोलकाताने अडखळत्या सुरुवातीनंतरही २० षटकांत ७ बाद २०४ धावा उभारल्या. यानंतर त्यांनी आरसीबीला १७.४ षटकांमध्ये केवळ १२३ धावांत गुंडाळले. 3 / 11शार्दूल ठाकूर आणि रहमानुल्लाह गुरबाझ यांचे आक्रमक अर्धशतक आणि वरुण चक्रवर्थी व सुयश शर्मा यांची शानदार फिरकी कोलकाताच्या विजयात निर्णायक ठरले. 4 / 11 धावांचा पाठलाग करताना कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली यांनी आक्रमक सुरुवात केली. मात्र, पाचव्या षटकात सुनील नरेनने कोहलीला बाद केले आणि यानंतर आरसीबीच्या फलंदाजीला गळती लागली. आरसीबीकडून कोणालाही खेळपट्टीवर फारवेळ तग धरता आला नाही. 5 / 11शार्दूलच्या आक्रमक खेळीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर देखील शार्दूलच्या फटकेबाजीची सोशल मीडियावर देखील चर्चा सुरु आहे. मात्र शार्दूलसोबतच कोलकाताविरुद्ध आरसीबीचा सामना पाहायला आलेल्या एका तरुणीची देखील सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 6 / 11बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने ईडन गार्डन्सच्या मैदानात हजेरी लावत आपल्या टीमला प्रोत्साहन दिले. त्याच्यासह त्याची मुलगी सुहाना खान आणि पीए पूजा दादलानी देखील उपस्थित होती. 7 / 11 या तीन जणांच्या व्यतिरिक्त आणखी एक मुलगी हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होती, ती म्हणजे शनाया कपूर. 8 / 11शनाया कपूर ही बॉलिवूड अभिनेता संजय कपूर यांची मुलगी आहे. तीने देखील या सामन्याचा आनंद घेतला. 9 / 11दरम्यान, प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यानंतर सलामीवीर रहमानुल्लाहने आक्रमक अर्धशतक झळकावले. त्याच्यामुळे काहीसे पुनरागमन केलेल्या कोलकाताला शार्दुलने भक्कम स्थितीत आणताना स्फोटक अर्धशतक झळकावले. त्यामुळे एकवेळ १४० धावाही कठीण दिसत असलेल्या कोलकाताने द्विशतक झळकावले. 10 / 11कोलकाताने अर्धा संघ ८९ धावांत गमावला होता. गुरबाझने रिंकू सिंगसोबत ३१ चेंडूत ४२ धावांची भागीदारी केल्यानंतर शार्दुलने रिंकूसोबत सहाव्या गड्यासाठी ४७ चेंडूत १०३ धावांची तुफानी भागीदारी केली.11 / 11शार्दूलने अवघ्या २० चेंडूत आयपीएलमधील पहिलेच वैयक्तिक अर्धशतक झळकवले. आणखी वाचा Subscribe to Notifications