Cricket Buzz»फोटो गॅलरी »कही खुशी, कही गम! RCBचा विचित्र पराक्रम, नारायणने मोडला मलिंगाचा विक्रम, पाहा 5 रेकॉर्ड्सकही खुशी, कही गम! RCBचा विचित्र पराक्रम, नारायणने मोडला मलिंगाचा विक्रम, पाहा 5 रेकॉर्ड्स By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 10:29 PMOpen in App1 / 6IPL 2024 KKR vs RCB 5 Records, Virat Kohli Sunil Narine: कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अटीतटीच्या लढतीत १ धावेने पराभव केला. शेवटच्या चेंडूवर KKRने सामना जिंकला. या सामन्यातील विजय मिळवत कोलकाताने अनेक विक्रम केले. पण त्यासोबतच हरणाऱ्या RCB संघाच्या नावावर काही विक्रम झाले. जाणून घेऊया ५ महत्त्वाचे विक्रम2 / 6KKRविरुद्धच्या या सामन्यात रजत पाटीदारने शानदार फलंदाजी केली. या सामन्यात रजतने अवघ्या 21 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. आरसीबीसाठी हे संयुक्त तिसरे जलद अर्धशतक ठरले. आरसीबीसाठी 21 धावांमध्ये अर्धशतक ठोकण्याचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावावरही आहे.3 / 6सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआर संघाने 222 धावा केल्या. या मोसमात तिसऱ्यांदा संघाने 200 किंवा त्याहून अधिक धावा केल्या. या प्रकरणात, एका हंगामात सर्वाधिक वेळा 200 किंवा त्याहून अधिक धावा करण्याच्या बाबतीत KKRने CSK आणि SRHची बरोबरी केली आहे.4 / 6IPLच्या इतिहासात RCBचा हा सर्वात कमी फरकाने झालेला पराभव आहे. KKRविरुद्ध RCBने अवघ्या 1 धावांनी सामना गमावला. याआधी 2014 मध्ये केकेआरविरुद्ध धावांच्या बाबतीत त्यांचा सर्वात जवळचा पराभव झाला होता. शारजाहमध्ये झालेल्या सामन्यात आरसीबी अवघ्या दोन धावांनी पराभूत झाली होती.5 / 6KKR संघाने 16 वर्षांनंतर RCB विरुद्ध आयपीएलमध्ये त्यांची संयुक्त दुसरी सर्वोच्च धावसंख्या करण्याचा विक्रम केला. या सामन्यात केकेआरने 222 धावा केल्या. त्याआधी IPL 2008 मध्ये KKR ने पहिल्यांदाच इतक्या धावा केल्या होत्या.6 / 6या सामन्यात, सुनील नारायणने KKRसाठी आपल्या चार षटकांमध्ये 34 धावांमध्ये दोन विकेट्स घेतल्या. यासह त्याने लसिथ मलिंगाचा विक्रम मोडला. कोणत्याही एका संघाकडून गोलंदाजीत सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत सुनील नारायण सर्वात पुढे गेला. त्याने KKRसाठी एकूण 172 विकेट्स घेतल्या. तर मलिंगाच्या नावे मुंबईकडून खेळताना 170 विकेट्स आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications