Cricket Buzz»फोटो गॅलरी »सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरलासुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 10:41 PMOpen in App1 / 8चेन्नई सुपर किंग्सविरूद्धच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शनने शतकी खेळी केली. आयपीएलमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या सुदर्शनने नव्या विक्रमाला गवसणी घातली. 2 / 8खरे तर आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी डावात १ हजार धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. या यादीत त्याने क्रिकेटचा देव म्हणून जगभर ख्याती असलेल्या सचिन तेंडुलकरला मागे टाकले.3 / 8स्फोटक खेळी करताना गुजरातकडून साई सुदर्शन आणि शुबमन गिल या दोघांनीही शतकी खेळी करून आपल्या संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. 4 / 8गिल पाठोपाठ सुदर्शनने देखील शतकाला गवसणी घातली. ७ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने सुदर्शनने अवघ्या ५१ चेंडूत १०३ धावा कुटल्या. 5 / 8साई सुदर्शनने अवघ्या २५ डावात आयपीएलमधील वैयक्तिक १ हजार धावा पूर्ण केल्या. यापूर्वी या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी होता.6 / 8सचिनने ३१ डावांमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने ३१ डावांत १ हजार धावांचा टप्पा गाठला.7 / 8या यादीत मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू तिलक वर्मा चौथ्या स्थानावर आहे. तिलकने ३३ डावांमध्ये १ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. 8 / 8आयपीएलमध्ये अनेक युवा भारतीय फलंदाज आपल्या चमदकार कामगिरीने सर्वांना प्रभावित करत आहेत. त्यातीलच एक प्रमुख नाव म्हणजे साई सुदर्शन. आणखी वाचा Subscribe to Notifications