IPL 2025 : लोकल टी-२० लीगमधून येऊन आयपीएलमध्ये छाप सोडणारे ५ नवे चेहरे

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात नव्या चेहऱ्यांनी विशेष छाप सोडल्याचे पाहायला मिळाले. एक नजर वेगवेगळ्या फ्रँचायझीतून लक्षवेधी ठरलेल्या पाच युवा चेहऱ्यांवर

आयपीएलच्या १८ व्या हंगामात पहिला आठवडा हा लोकल लीगमधून आलेल्या युवा पोरांनी गाजवल्याचे पाहायला मिळाले. वानखेडेच्या मैदानात अश्वनीच्या दमदार पदार्पणाची चांगलीच चर्चा रंगताना दिसते. इथं एक नजर टाकुयात लोकल लीगमध्ये धमक दाखवून IPL गाजवणाऱ्या नव्या चेहऱ्यांवर

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून खेळताना वानखेडेच्या मैदानात चमकलेला अश्वनी कुमार हा पंजाबमधील शेर-ए-पंजाब टी-२० लीग स्पर्धेतून हेरलेला हिरा आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याने ३ षटकात २४ धावा खर्च करत ४ विकेट्स घेत लक्षवेधून घेतले

३० लाख या मूळ किंमतीत मुंबई इंडियन्सला मिळालेला २३ वर्षीय अनमोल खेळाडू पंजाबमधील झंजेरी या छोट्याशा गावातून आलाय.

विपराज निगम हा यूपी टी -२० लीगमधून धमक दाखवून आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसतोय.

यूपीच्या या २० वर्षीय पोरानं आपल्या अष्टपैलू खेळीनं सर्वांना चकित करून सोडले आहे. फलंदाजीशिवाय गोलंदाजीतही त्याने धमक दाखवून दिलीये.

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातूनच आणखी एका हिरोनं दाबात एन्ट्री मारली. तो म्हणजे विघ्नेश पुथुर. केरळ टी -२० लीगमधून आलेल्या २४ वर्षीय विग्नेशनं चेन्नई विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात ३ विकेट्स घेतल्याचे पाहायला मिळाले. विघ्नेश केरळमधील मलप्पुरमचा रहिवाशी आहे. मेगा लिलावात या खेळाडूलाही मुंबई इंडियन्सच्या संघानं ३० लाख या मूळ किंमतीसह आपल्या ताफ्यात घेतले होते.

अनिकेत वर्मा हा मध्य प्रदेश लीगमध्ये प्रकाश झोतात आला. सनरायझर्स हैदराबादच्या संघान २३ वर्षीय खेळाडूवर ३० लाखाची बोली लावली होती. यूपीतील झांशी या शहरातून आलेल्या या खेळाडूनं एकही देशांतर्गत सामना न खेळता आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. स्फोटक फलंदाजीचा भरणा असलेल्या खेळाडूंच्या गर्दीत त्याने आपली छाप सोडलीये.