Join us  

BCCI ची बैठक! धोनीसाठी CSK ची मोठी मागणी; पण SRH च्या काव्या मारनने दर्शवला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 11:45 AM

Open in App
1 / 10

आयपीएल म्हणजे क्रिकेच चाहत्यांसाठी एक पर्वणीच. जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-२० लीग अर्थात आयपीएल. आयपीएलच्या आगामी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. आयपीएल २०२५ साठी नवीन नियम केले जातील असे कळते.

2 / 10

बीसीसीआय मेगा लिलावासाठी तयार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, लिलावातील नियमांवरून फ्रँचायझींमध्ये एकमत झाले नाही. प्रत्येक फ्रँचायझीच्या मालकांची वेगळे मत असल्याचे दिसते.

3 / 10

आयपीएलमधील इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमासह इतर अनेक मुद्द्यांवर बीसीसीआय आणि संघ मालकांमध्ये मतमतांतरे आहेत. अशातच सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीची मालकीण काव्या मारनची नाराजी समोर आली आहे.

4 / 10

हैदराबादच्या फ्रँचायझीची मालकीण काव्या मारनने नियमांवरून नाराजी व्यक्त केली. बीसीसीआयसोबत फ्रँचायझींच्या मालकांची बैठक पार पडली. यानंतर काव्याने आपली खदखद सांगितली.

5 / 10

ती म्हणाली की, संघ बनवण्यासाठी खूप वेळ लागतो. त्याआधी खूप विचार करावा लागतो. युवा खेळाडूंमध्ये गुंतवणूक करावी लागते. त्यांना तयार करण्यासाठी फार वेळ लागतो. त्यामुळे मेगा लिलाव घेणे हे योग्य नाही. कारण की लिलावात आपल्या संघातील शिलेदार दुसऱ्या संघाचा भाग बनतात. मग त्यांच्यावर प्रशिक्षक आणि संघातील वरिष्ठ खेळाडूंनी केलेल्या गुंतवणूकीचा फायदा होत नाही, अशी माहिती क्रिकबझने दिली.

6 / 10

खरे तर युवा खेळाडूंमध्ये केलेली गुंतवणूक सांगताना काव्या मारनने अभिषेक शर्माचे उदाहरण दिले. अभिषेक शर्माला तयार करण्यासाठी तीन वर्षे लागली. या खेळाडूला तयार करण्यासाठी आम्ही तीन वर्षे खर्च केली, असे तिने सांगितले.

7 / 10

आता अभिषेक आमच्यासाठी चांगली कामगिरी करत आहे. त्याच्यासाठी फ्रँचायझीने खूप मेहनत घेतली. केवळ अभिषेक शर्माच नाही तर इतरही खेळाडूंचे उदाहरण देता येईल. अशाच प्रकारची उदाहरणं इतरही संघांमध्ये पाहायला मिळतील, असेही काव्या मारनने नमूद केले. एकूण काव्या मेगा लिलावाच्या विरोधात आहे.

8 / 10

चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापनाने BCCI ला मेगा लिलावापूर्वी एमएस धोनीचा अनकॅप्ड खेळाडू म्हणून विचार करण्याची विनंती केली. माहितीनुसार, CSK ला जुना नियम पुन्हा लागू करायचा आहे. या नियमानुसार जर एखादा खेळाडू निवृत्त होऊन पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल, तर तो अनकॅप्ड खेळाडू मानला जाईल. पण, याला काव्या मारनने विरोध केल्याचे कळते.

9 / 10

सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनने नुकत्याच झालेल्या बैठकीत सांगितले की, जर एखाद्या निवृत्त खेळाडूला अनकॅप्ड असे टॅग लावून लिलावात आणले तर ते चुकीचे आहे. अशाने तो महान खेळाडू असल्याची जाणीव राहणार नाही.

10 / 10

काव्याच्या मते, जर लिलावात (धोनीला अनकॅप्ड गृहीत धरून) अनकॅप्ड खेळाडू आला आणि रिटेन केलेल्या अनकॅप्ड खेळाडूपेक्षा जास्त पैसे घेत असेल तर तो धोनीसारख्या दिग्गजांचा अपमान होईल. एकूणच धोनीने लिलावात उतरावे त्यामुळे त्याला योग्य किंमत मिळेल, असे काव्या मारनने स्पष्ट केले.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल २०२४सनरायझर्स हैदराबादचेन्नई सुपर किंग्सआयपीएल लिलाव