रिंकू सिंगने गावी केली आलिशान घराची खरेदी; युवा खेळाडूच्या पगारात २४ पटीने झालीय वाढ

रिंकू सिंगने आलिशान घराची खरेदी केली.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू रिंकू सिंगला अलीकडेच कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने आयपीएल २०२५ साठी १३ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले आहे.

रिंकू सिंगने गेल्या काही हंगामात केकेआरसाठी अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळेच त्याला टीम इंडियातही संधी मिळाली. भारतीय संघात रिंकू सिंग आता ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये फिनिशरची भूमिका बजावत आहे.

कोलकाता नाईट रायडर्सच्या फ्रँचायझीने सहा खेळाडूंना रिटेन केले. यामध्ये रिंकू सिंग, वरुण चक्रवर्थी, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा आणि रमणदीप सिंगचा समावेश आहे.

टीम इंडियात आपली चमक दाखवणाऱ्या रिंकू सिंगसाठी कोलकाता नाईट रायडर्स उदार झाली. गेल्या वर्षी केवळ ५५ लाखांत मिळालेला रिंकू यंदा तब्बल १३ कोटी घेऊन गेला. त्याचे मानधनही २२६४% वाढले.

रिंकू सिंगने दिवाळीच्या मुहूर्तावर आपल्या गावी अलीगढमध्ये एक आलिशान घराची खरेदी केली. रिंकू सिंगने अलीगढमधील ओझोन सिटीमधील 'द गोल्डन स्टेट'मध्ये नवीन खरेदी केली आहे.

ऑक्टोबरमध्येच रिंकूने त्याच्या नवीन घरात गृहप्रवेश केला. २० ऑक्टोबर रोजी नवीन घराच्या चाव्या रिंकू सिंगकडे सुपूर्द करण्यात आल्या.

रिंकूला गेल्या हंगामात KKR कडून फक्त ५५ लाख रुपये मिळाले होते, पण IPL 2025 मध्ये रिंकूला एक प्रभावी खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आले. आगामी हंगामासाठी त्याला १३ कोटी मिळाल्याने रिंकूच्या पगारात २४ पटीने वाढ झाली.