महेंद्रसिंह धोनी म्हणजे CSK चा हुकमी एक्का. क्रिकेटच्या मैदानातील यशस्वी कर्णधारानं CSK फ्रँचायझी संघाकडूनही अनेक विक्रम नोंदवले आहेत. CSK ला जी अफाट लोकप्रियता मिळाली त्यामागचं कारण ही धोनीच ठरला.
गत हंगामात खेळाडूच्या रुपात खेळणाऱ्या धोनीनं आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात मैदानात उतरत इतिहास रचला. ४ कोटींसह घाट्याच्या सौद्यासह त्याने फ्रँचायझी संघासोबतच बॉन्डिंग जपलं.
IPL च्या इतिहासात आता धोनी एक नवा चॅप्टर घेऊन येतोय. ऋतुराज गायकवाडनं दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्यावर आता धोनी पुन्हा CSK चे नेतृत्व करताना दिसणार आहे. पुन्हा ही जबाबदारी खांद्यावर पडताच त्याच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद झालीये. हा रेकॉर्ड मोडणं अशक्यच आहे.
आयपीएलच्या १८ वर्षात जे कधीच पाहायला मिळालं नाही ते या हंगामात धोनीच्या रुपात पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच एक अनकॅप्ड खेळाडू IPL मधील संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
एमएस धोनीनं २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. जो खेळाडू पाच वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही तो अनकॅप्ड श्रेणीतून मैदानात उतरेल, असा नियम यंदाच्या हंगामापासून लागू झाला. धोनी त्याच नियमानुसार अनकॅप्ड खेळाडूच्या रुपात CSK सोबत कायम राहिला. आता त्याला अनकॅप्ड कॅप्टनचा टॅग लागलाय.
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात कर्णधाराच्या रुपात सर्वाधिक मॅचेस खेळण्याचा रेकॉर्ड हा धोनीच्या नावेच आहे. IPL मध्ये आतापर्यंत २२६ सामन्यात नेतृत्व केले आहे.
तोच आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारही आहे. ५९.३७ विनिंग पर्सेंटेजसह IPL मध्ये कॅप्टन्सीच्या रुपात त्याच्या नावे सर्वाधिक ११३ सामने जिंकण्याची नोंद आहे. ही कामगिरी आणखी भक्कम करण्याची संधी त्याच्यासमोर असेल.
आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धोनी विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीनं RCB चे नेतृत्व करताना ४८८१ धावा केल्या आहेत. धोनीच्या खात्यात ४६६० धावा जमा आहेत.
धोनीच्या नेतृत्वाखालील पहिल्या १४ हंगामात चेन्नई सुपर किंग्जच्या संघानं १० वेळा IPL फायनल खेळली. त्याने २०१०, २०११, २०१८,२०२१ आणि २०२३ असे पाच वेळा संघाला जेतेपद मिळवून दिले आहे.
उर्वरित सामन्यात जादू दाखवत यंदाच्या हगामात CSK चा संघ नवा इतिहास रचणार का? तेही पाहण्याजोगे असेल.