कार अपघातानंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं क्रिकेट विसरून जा! आज 'तो' IPL गाजवतोय

कित्येक महिने तो दवाखान्यात पडून होता. क्रिकेट तर संपल्यात जमा होतं.

२०२५ च्या हंगामात निकोलस पूरन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो सुरुवातीपासून ऑरेंज कॅप घालून मिरवताना दिसते.

लखनौ संघाकडून खेळणारा निकोलस आला की दे दणादण चोपायला लागतो. यापूर्वी पंजाब संघाकडूनही तो खेळत होता.

खरं तर वयाच्या १९व्या वर्षी जवळच्या माणसांसह डॉक्टरांनीही त्याला सांगितलं होतं की तू आयुष्यात स्वतःच्या पायावर उभा राहिला, चालू शकला तरी फार आहे. क्रिकेट विसरून जा!

वेस्ट इंडिज-त्रिनिदादमध्ये हा लहान मुलगा दणक्यात बॅटिंग करायचा. मात्र एकदिवस क्रिकेटचा सराव करुन घरी परतत असताना त्याचा अपघात झाला. घोटे, गुडघे फॅक्टर झाले. डाव्या पायात सर्वत्र काचा घुसल्या. दोन्ही पाय जागचे हलत नव्हते.

कित्येक महिने तो दवाखान्यात पडून होता. क्रिकेट तर संपल्यात जमा होतं. काही दिवसांनी तो व्हीलचेअरवर पोहोचला.

एका मुलाखतीत निकोलसनं सांगितलं होतं, मी दवाखान्यात पडल्या पडल्या डोळे मिटून फक्त स्वतःला क्रिकेट खेळताना पाहत होतो. डोक्यात हेच होतं की आज जे डोळे मिटून पाहतोय ते एक दिवस खरं होईल.

हे सारं होत घडलं असताना मी चालूही शकणार नाही असं डॉक्टरांना वाटत होतं, पण योग्य उपचार, मेहनत, सराव यामुळे मी हळूहळू चालायला लागलो, असे त्याने सांगितले होते.

२०१६ साली मी मैदानात उतरलो.. मला क्रिकेट हवं होतंच, पण त्या काळात माझ्या लक्षात आलं की क्रिकेटलाही मी हवा आहे!'