आगामी आयपीएलसाठी २४ आणि २५ नोव्हेंबरला मेगालिलाव होणार आहे. या लिलावासाठी सर्व १० संघ तयार आहेत. जाणून घेऊया, प्रत्येक संघात किती जागा शिल्लक आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने ५ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २० खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ७ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल.
दिल्ली कॅपिटल्स संघाने ४ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २१ खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ७ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल.
गुजरात टायटन्स संघाने ५ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २० खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ७ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल.
कोलकाता नाइट रायडर्स संघाने ६ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण १९ खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ६ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल.
लखनौ सुपर जायंट्स संघाने ५ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २० खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ७ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल.
पंजाब किंग्ज संघाने फक्त २ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २३ खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ८ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल.
राजस्थान रॉयल्स संघाने ६ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण १९ खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ७ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल.
सनरायजर्स हैदराबाद संघाने ५ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २० खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ५ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल.
मुंबई इंडियन्स संघाने ५ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २० खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ८ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ३ खेळाडू रिटेन केलेत. त्यामुळे त्यांना आता एकूण २२ खेळाडू खरेदी करता येतील. त्यात जास्तीत जास्त ८ परदेशी खेळाडूंचा समावेश करता येईल.