जसप्रीत बुमराह हा क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याचा सामना करणं कोणत्याही फलंदाजासाठी एक मोठं आव्हानच असते.
आपल्या भेदक माऱ्यासमोर भल्या भल्या फलंदाजांना चारीमुंड्या चित करणाऱ्या बुमराहविरुद्ध करुण नायरनं केलेली फटकेबाजी चर्चेचा विषय ठरत आहे. एक नजर टाकुयात सर्वोत्तम गोलंदाजाविरुद्ध आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांवर
आयपीएलमध्ये बुमराहविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शिखर धवन आघाडीवर आहे. २०१६ च्या हंगामात त्याने बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करताना १६ चेंडूत २७ धावा काढल्याचा रेकॉर्ड आहे.
करुण नायर या यादीत आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना बुमराहचा सामना करताना त्याने ९ चेंडूत २६ धावा काढल्या.
राहुल त्रिपाठीनं २०२१ च्या हंगामात बुमराहचा सामना करताना ११ चेंडूत २५ धावा कुटल्या होत्या.
वृद्धिमान साहानं २०२२ च्या हंगामात जसप्रीत बुमराह विरुद्ध ९ चेंडूत २५ धावा काढल्याचा रेकॉर्ड आहे.
जसप्रीत बुमराहने आयपीएल पदार्पणात विराट कोहलीची विकेट घेऊन मैफिल लुटली होती. २०१५ च्या हंगामात कोहलीने त्याचा सामना करताना १२ चेंडूत २३ धावा केल्या होत्या.
आयपीएलमध्ये बुमराहविरुद्ध एका षटकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पॅट कमिन्सचा नंबर लागतो. पॅटनं २०२२ च्या हंगामात कोलकाताकडून खेळताना बुमराहच्या एका षटकात २६ धावा कुटल्या होत्या.