इंडियन प्रीमिअर लीगमध्ये प्रत्येक संघाला त्यांच्या अंतिम ११ मध्ये चार परदेशी खेळाडूंना खेळवण्याची मुभा आहे. पण, चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-२०च्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या ( CSK) सामन्यात त्यांनी पाच परदेशी खेळाडू मैदानावर उतरवले होते. त्यावेळी MI च्या ताफ्यातील अनेक भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त होते आणि त्यामुळे पाच परदेशी खेळाडू खेळवण्याची मुभा त्यांना देण्यात आली. किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, अँड्य्रू सायमंड, डॅवी जेकब्स आणि एडन ब्लिझार्ड हे पाच खेळाडू खेळले होते. MIनं हा सामना जिंकला आणि त्यात लसिथ मलिंगानं फलंदाजीत १८ चेंडूंत नाबाद ३७ धावा व मुरली विजयची विकेट घेत सिंहाचा वाटा उचलला.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या MIचं नाव वेगळं असतं. मुंबई इंडियन्सच्या लोगोमध्ये सुदर्शन चक्र किंवा रेझर असतं. पण, सचिन तेंडुलकरनं सुदर्शन चक्र ठेवण्याचा सल्ला देताना मुंबई इंडियन्स हे नाव सुचवले अन् तेच नाव सर्वांना स्वीकारले.
मुंबई इंडियन्सचे मालक मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स हा सर्वात महागडी फ्रँचायझी असेल याचं आश्चर्य वाटायला नको. ११२ मिलीयन डॉलर ( 8,21,24,56,000) इतकी आहे.
मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अनेक राखीव खेळाडू होते आणि त्याची चाहत्यांना माहितीही नसावी. मनीष पांडे व अॅलेक्स हेल्स हे मुंबई इंडियन्सचे सदस्य होते. आयपीएलच्या पहिल्या पर्वात मनीष पांडे संघाचा सदस्य होता आणि फक्त तीनच सामने खेळला. आयपीएलच्या ९व्या पर्वात कोरी अँडरसन हा दुखापतग्रस्त झाल्यानंतर अॅसेक्स हेल्स याला त्याच्याबदल्यात करारबद्ध केले गेले. पण, तो एकही सामना खेळला नाही.
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो याने किएरॉन पोलार्डला आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सशी जोडण्यात मोलाची भूमिका बजावली. ब्राव्हो २००८ आणि २०१० या पर्वात मुंबई इंडियन्सकडून खेळला. तो सीएसकेसोबत जुळताच मुंबई संघ ब्राव्होचा पर्याय शोधत होता, तेव्हा ब्राव्होनं पोलार्डचं नाव सूचवलं.