Join us  

IPLच्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सच्या नवा खेळाडूचा एकच राडा! धावांचा पाऊस पाडला, इशाराच दिला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 7:36 PM

Open in App
1 / 8

आयपीएल २०२२ साठीचा लिलाव पूर्ण झाला असून सर्व संघ पूर्णपणे सज्ज झाले आहेत. संघांनी असेही काही खेळाडू आपल्या ताफ्यात दाखल केले आहेत की ज्यांची लिलावाआधीपासूनच जोरदार चर्चा होती. अंडर-१९ वर्ल्डकपमधील द.आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेवाल्ड ब्रेविस यातीलच एक खेळाडू आहे.

2 / 8

ब्रेविस या युवा खेळाडूसाठी मुंबई इंडियन्स संघानं तब्बल ३ कोटी रुपये मोजून संघात दाखल केलं आहे. लिलावाच्या दुसऱ्याच दिवशी ब्रेविसनं तडफदार खेळी साकारत मुंबई इंडियन्सचे फॅन्सना आणि येणाऱ्या स्पर्धेची एक झलकच सादर केली आहे.

3 / 8

अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ब्रेविस यानं द.आफ्रिकेच्या ट्वेन्टी-२० चॅलेंजमध्ये स्थानिक संघ टायटन्सकडून खेळताना आज एक जबरदस्त खेळी साकारली आहे.

4 / 8

प्रतिस्पर्धी डॉलफिन्स संघाकडून मिळालेल्या १३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ब्रेविस यानं फक्त ३० चेंडूत नाबाद ४६ धावा ठोकल्या आणि संघाला सात विकेट्सनं विजय प्राप्त करुन दिला आहे.

5 / 8

१८ वर्षीय डेवाल्ड ब्रेविस याला यंदाच्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सनं ३ कोटी रुपये मोजून संघात स्थान दिलं आहे. यासह ब्रेविस सर्वाधिक किमतीची बोली लागलेला पहिला अंडर-१९ खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात एखाद्या अंडर-१९ खेळाडूला मिळालेली ही सर्वाधिक बोली आहे.

6 / 8

ब्रेविसनं यंदाच्या अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक ५०६ धावा करत रेकॉर्ड केला आहे. तसंच तो स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू देखील ठरला आहे.

7 / 8

ब्रेविस व्यतिरिक्त या सामन्यात क्विंटन डी कॉक आणि डेव्हिड मिलरसारखे अनुभवी खेळाडू देखील सामील होते. या दोघांनाही आयपीएलमध्ये यंदा नव्या संघांनी खरेदी केलं आहे.

8 / 8

गुजरात टायटन्सचा नवा खेळाडू डेव्हिड मिलर यानं ट्वेन्टी-२० चॅलेंजमध्ये डॉलफिन्सकडून ४० चेंडूत नाबाद ५७ धावा केल्या. तर क्विंटन डी कॉक यानं २६ धावा केल्या. डिकॉक याला आयपीएल लिलावात लखनऊ सुपर जाएंट्स संघानं खरेदी केलं आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२आयपीएल लिलावमुंबई इंडियन्स
Open in App