Tim David, IPL Auction 2022 Live Updates : विराटच्या माजी भीडूने पाकिस्तान्यांची लावली वाट, आयपीएल लिलावात असेल त्याचाच थाट!

Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठीच्या मेगा ऑक्शनची प्रतीक्षा आता संपली आहे. २४ तासांहून कमी कालावधीत आयपीएल 2022 ऑक्शनला सुरुवात होणार आहे.

Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठीच्या मेगा ऑक्शनची प्रतीक्षा आता संपली आहे. २४ तासांहून कमी कालावधीत आयपीएल 2022 ऑक्शनला सुरुवात होणार आहे. ५९० खेळाडूंनी आयपीएल लिलावात नावं नोंदवली आहेत. त्यात २०३ गोलंदाज, १०२ फलंदाज, २२७ अष्टपैलू आणि ५८ यष्टिरक्षकांचा समावेश आहे.

पण, यापैकी पहिल्या दिवशी केवळ १६१ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. शिखर धवन, मोहम्मद शमी, फॅफ ड्यू प्लेसिस, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, श्रेयस अय्यर, आर अश्विन, क्विंटन डी कॉक, कागिसो रबाडा आणि ट्रेंट बोल्ट यांना Marquee खेळाडूंचा मान दिला गेला आहे. त्यांच्यापासूनच आयपीएल लिलावाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात होणार आहे.

पण, या Marquee खेळाडूंमध्ये नाव नसलेला एक फलंदाज सर्वांना हवाहवासा आहे. आयपीएल २०२१मध्ये त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) कडून पदार्पण करताच विक्रमाची नोंद केली होती. त्याला एकच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली असली तरी यंदाच्या लिलावात त्याच्यावर सर्वाधिक बोली लागल्यास आश्चर्य वाटायला नको.

पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याने तुफान फटकेबाजी केली आहे. टीम डेव्हिड असे या फलंदाजाचे नाव आहे आणि त्याने PSL मध्ये 28*(16), 71(29), 51*(19) आणि 34(18) अशी फटकेबाजी केली आहे. त्याचा बेधडक खेळ प्रत्येक फ्रँचायझीला हवासा आहे.

सिंगापूर संघाला अजूनही कसोटी व वन डे संघाचा दर्जा मिळालेला नाही आणि सिंगापूरचा हा खेळाडू आयपीएल खेळला आणि आयपीएल खेळणारा तो सिंगापूरचा पहिलाच खेळाडू ठरला होता.

६ फुटांच्या डेव्हिडनं १५८पेक्षा अधिक स्ट्राईक रेटनं १४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ५५८ धावा केल्या आहेत. त्यानं एकूण ४९ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत आणि त्यात बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग मधील सामन्यांचा समावेश आहे. त्यात त्यानं ११७१ धावा केल्या आहेत.

बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्स आणि पर्थ स्कॉर्चर्स संघाचे त्यानं प्रतिनिधित्व केले आहे. नुकत्याच झालेल्या रॉयल लंडन कप स्पर्धेत त्यानं सरे क्लबचे प्रतिनिधित्व करताना लिस्ट ए क्रिकेटमधील दोन शतकं झळकावली. त्यानं तीन सामन्यांत 140*(70), 52*(38) & 102(73) अशा धावा कुटल्या आहेत. त्याच्या समावेशनं RCBच्या मधळ्या फळीला मजबूती मिळणार आहे.

२५ वर्षांच्या डेव्हिडचे वडील रॉड हेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते. त्यांनी १९९७च्या वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत सिंगापूर संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. डेव्हिड सिंगापूरचा नागरिक आहे, परंतु त्याचे कुटुंबीय ऑस्ट्रेलियात पुन्हा राहायला गेले अन् डेव्हिड तिथेच लहानाचा मोठा झाला.