IPL Auction 2023: आयपीएल ऑक्शनमध्ये या खेळाडूंना 2 कोटींची बेस प्राईज; पण एकही भारतीय नाही...

क्रिकेटप्रेमींसाठी आयपीएल ही पर्वणी असली तरी खेळाडूंना देखील तुफान पैसा कमविण्याचे हे साधन असणार आहे.

आयपीएलची तयारी सुरु झाली आहे. २३ डिसेंबरला खेळाडूंचा लिलाव असणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आयपीएल सुरु होणार आहे. क्रिकेटप्रेमींसाठी आयपीएल ही पर्वणी असली तरी खेळाडूंना देखील तुफान पैसा कमविण्याचे हे साधन असणार आहे. काही खेळाडूंना दोन दोन कोटींची बेस प्राईज आहे, म्हणजे या खेळाडूंची किंमत १०-१२ कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. कोण आहेत हे खेळाडू...

इंग्लंडचा 24 वर्षीय अष्टपैलू खेळाडू सॅम कॅरेनचाही 2 कोटींच्या यादीत समावेश आहे. त्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 41 बळी घेतले आहेत आणि 35 सामन्यांमध्ये एकूण 158 धावा केल्या आहेत. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जमधून खेळत होता.

जगातील दिग्गज अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या बेन स्टोक्सचे नाव 2 कोटींच्या यादीत असणार आहे. 31 वर्षीय स्टोक्सने एकूण 157 टी-20 सामन्यांमध्ये 3008 धावा केल्या आहेत आणि 93 बळी घेतले आहेत. यामुळे टीम त्याच्यावर पैशांची उधळण करण्याची शक्यता आहेत.

न्यूझीलंडचा कॅप्टन केन विलियमसनची बेस प्राईज दोन कोटी रुपये आहे. त्याने टी २० वर्ल्डकपपासून कप्तानी सुरु केली होती. त्याने आतापर्यंत ८७ ट्वेंटी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2464 रन्स बनविले आहेत. यात १७ अर्धशतकेही आहेत.

श्रीलंकेचा अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजनेही 2 कोटींच्या यादीत एन्ट्री केली आहे. T20 मध्ये 173 सामन्यांमध्ये 11 अर्धशतकांसह एकूण 2788 धावा केल्या आहेत. तसेच 85 बळी घेतले आहेत.

वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक निकोलस पूरनचीही बेस प्राईज २ कोटी रुपये आहे. 27 वर्षीय पुरण आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या संघांकडून खेळला आहे. T20 मध्ये एकूण 256 सामन्यांमध्ये एकूण 4942 धावा केल्या आहेत ज्यात एक शतक आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे.

वेस्ट इंडिजचा उंच अष्टपैलू जेसन होल्डरने आतापर्यंत एकूण 200 टी-20 सामने खेळले आहेत. तो देखील २ कोटींच्या क्लबमध्ये आहे.

याचबरोबर ख्रिस जॉर्डन, नॅथन कुल्टर-नाईल, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, ख्रिस लिन, टॉम बॅंटन, टायमल मिल्स, जेमी ओव्हरटन, क्रेग ओव्हरटन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, अॅडम मिल्ने, जिमी नीशम, रिले रॉसौ आणि रॅसी व्हॅन डेर यांचाही दोन कोटींच्या एलिट लिस्टमध्ये सहभाग आहे.