IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!

5 biggest price drops in IPL Auction 2025 : आतापर्यंतच्या लिलावात परदेशी खेळाडू मालामाल झाले होते. पण या वेळच्या लिलावात अनेक परदेशी स्टार खेळाडूंना अपेक्षेपेक्षा कमी बोली लागली. पाहूया भाव घसरलेले TOP 5 स्टार खेळाडू…

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी २४ आणि २५ नोव्हेंबर दरम्यान मेगालिलाव झाला. भारतीय खेळाडूंवर मोठ्या बोली लागल्या. हंगामातील TOP 5 महागडे खेळाडू भारतीयच ठरले.

आतापर्यंतच्या लिलावात परदेशी खेळाडू मालामाल झाले होते. पण या वेळच्या लिलावात अनेक परदेशी स्टार खेळाडूंना अपेक्षेपेक्षा कमी बोली लागली. पाहूया भाव घसरलेले TOP 5 स्टार खेळाडू…

ग्लेन मॅक्सवेल कायम लिलावात मोठा भाव मिळवतो. पण यावेळेस त्याच्यावर फारशी बोली लागली नाही. गेल्या वेळचा ११ कोटींचा मॅक्सवेल यावेळी ४ कोटी २० लाखांच्या बोलीसह पंजाब किंग्ज संघात गेला. त्याचा भाव ६ कोटी ८० लाखांनी पडला.

कोलकाता संघाला मिचेल स्टार्कला विकत घेता आले नाही. त्यामुळे त्यांनी डावखुरा वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सनला अवघ्या २ कोटी ८० लाखांना संघात घेतले. गेल्या वेळी गुजरात टायटन्स ने त्याला १० कोटींना विकत घेतले होते. त्याचा भाव ७ कोटी २० लाखांनी पडला.

भारताचा उदयोन्मुख खेळाडू समीर रिझवी याचा यंदाच्या लिलावात भाव घसरला. गेल्या वेळेस चेन्नई सुपर किंग्जने तब्बल ८ कोटी ४० लाखांना विकत घेतले होते. पण यावेळी त्याला दिल्ली कॅपिटल्सने अवघ्या ९५ लाखांत विकत घेतले. त्याचा भाव ७ कोटी ४५ लाखांनी घसरला.

ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क प्रतिभावान वेगवान गोलंदाज असूनही त्याला अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळाला. गेल्या वर्षी तो कोलकाता संघात २४ कोटी ७५ लाखांच्या बोलीसह सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. यावेळी दिल्लीने त्याला ११ कोटी ७५ लाखांना विकत घेतले. त्याचा भाव १३ कोटींनी खाली आला.

इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करनचा भाव यंदा सर्वाधिक घसरला. गेल्या वेळी पंजाब किंग्जने सॅमला तब्बल १८ कोटी ५० लाखांना विकत घेतले होते. पण यंदा चेन्नई सुपर किंग्जने त्याला केवळ २ कोटी ४० लाखांना खरेदी केले. त्याचा भाव १६ कोटी १० लाखांनी घसरला.