IPL ची आजच झाली होती सुरुवात! फक्त ४ क्रिकेटपटू खेळू शकलेत सर्व १८ सीझन, पाहा यादी

IPL All 18 Seasons Players List: एकाने 'मुंबई इंडियन्स'मधून केलेली सुरूवात, पण तो रोहित शर्मा नव्हे!

भारतीय क्रिकेटला जगात ओळख आणि सन्मान मिळवून देणाऱ्या आयपीएल स्पर्धेला आज १८ वर्षे पूर्ण झाली. १८ एप्रिल २००८ ला आयपीएलचा पहिला सामना खेळला गेला. त्यात ब्रेंडन मॅक्क्युलमने नाबाद १५८ धावा केल्या होत्या.

आयपीएलमध्ये त्यानंतर वर्षागणिक अनेक बदल झाले. प्रत्येक संघात अनेक खेळाडू खेळले, करारमुक्त झाले आणि काहींनी क्रिकेटला रामरामही ठोकला. परंतु असे ४ खेळाडू आहेत ज्यांनी आयपीएलचे सर्व १८ हंगाम खेळलेत. पाहूया त्यांची यादी.

वयाच्या ४३ वर्षीही धोनी आयपीएलमध्ये खेळतोय. सध्या चेन्नईचा कर्णधार आहे. त्याने १६ हंगाम चेन्नई संघाकडून खेळले आणि ५ विजेतेपदे मिळवली. तसेच त्याने दोन हंगाम रायजिंग पुणे सुपरजायंट्सकडूनही खेळले.

रोहितने आपल्या आयपीएलची सुरूवात डेक्कन चार्जर्स संघातून केली होती. २०११ मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला संघात घेतले आणि त्यानंतर त्याने संघाला ५ ट्रॉफी जिंकवून दिल्या. तसेच डेक्कन चार्जर्सकडून खेळताना विजेतेपद पकडून रोहितकडे एकूण ६ ट्रॉफी आहेत.

विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे जो पहिल्या हंगामापासून एकाच संघाकडून खेळताना दिसतोय. विराटने सर्व १८ हंगाम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून खेळले. त्याने संघाचे नेतृत्वही केले, पण त्याला अद्याप ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

इतर तीन खेळाडूंच्या तुलनेत हा खेळाडू तितका मोठा नसला तरीही आयपीएमध्ये तो कायम खेळताना दिसला आहेत. त्याने २००८ मध्ये सुरुवात मुंबई इंडियन्सकडून केली. नंतर बंगळुरू (२००९-१०), पुणे वॉरियर्स इंडिया (२०११-१३), कोलकाता नाइट रायडर्स (२०१४-१७), सनरायजर्स हैदराबाद (२०१८-२१), लखनौ सुपर जायंट्स (२०२२), दिल्ली कॅपिटल्स (२०२३) आणि आता पुन्हा कोलकाता नाईट रायडर्स (२०२४-२५) अशा विविध संघांचे प्रतिनिधित्व केले.