Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL: 'हे' चार खेळाडू मुंबई इंडियन्सला बनवू शकतील चॅम्पियन?IPL: 'हे' चार खेळाडू मुंबई इंडियन्सला बनवू शकतील चॅम्पियन? By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 7:10 PMOpen in App1 / 5मुंबई : 23 मार्चपासून इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 12 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. आयपीएलमधील आठ टीमची जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबई इंडियन्स टीम (MI) 2013, 2015 आणि 2017 मध्ये आयपीएल विजेता ठरली आहे. मुंबई इंडियन्स टीममध्ये असे चार विदेशी खेळाडू आहेत. ते मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवू शकतात. 2 / 51. क्विंटन डि कॉक : गेल्यावर्षी आरसीबी टीमकडून खेळणारे साऊथ आफ्रिकाचे स्टार विकेटकीपर क्विंटन डि कॉक यंदा मुंबई इंडियन्स टीमकडून खेळणार आहेत. क्विंटन डि कॉक शानदार फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे याचा फायदा मुंबई इंडियन्सला होऊ शकेल. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत 353 धावांची धडाकेबाज खेळी केली होती. 3 / 52. बेन कटिंग: मुंबई इंडियन्सजवळ बेन कटिंग सारखा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्या विस्फोटक खेळीने मुंबई इंडियन्सच्या धावसंख्येत मोठी मदत होऊ शकते. 2016 मध्ये आयपीएलच्या फायनलमध्ये सनराजर्स हैदराबादकडून खेळताना बेन कटिंगने 15 चेंडूत तीन चौकार आणि 6 षटकार लगावत 39 धावा केल्या होत्या. त्यावेळी त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आले होते. 4 / 53. केरॉन पोलार्ड: केरॉन पोलार्डने गेल्या काही दिवसांपूर्वी टी-20 मध्ये आपल्या 9000 धावांचा टप्पा पूर्ण केला. ऑलराऊंडर असलेल्या केरॉन पोलार्डचा फायदा मुंबई इंडियन्सला नक्कीच होईल. टी-20 क्रिकेटमध्ये 9000 धावांचा टप्पा पार करणारा केरॉन पोलार्ड जगातील तिसरा खेळाडू आहे.5 / 54. इविन लुईस: टी-20 क्रिकेटमध्ये छोटे गेल म्हणून ओळखला जाणारा इविन लुईसचे रेकॉर्ड चांगले आहे. टी-20मध्ये इविन लुईसच्या नावावर 123 सामन्यात 3607 धावांचा समावेश आहे. तसेच, त्याच्या नावावर 4 शतक आणि 25 अर्धशतके आहेत. दरम्यान, आयपीएलच्या आगामी हंगामात मुंबई इंडियन्सला इविन लुईसचा नक्कीच फायदा होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications