Join us  

विराट कोहलीचा RCB जिंकू शकतो IPL 2020; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं सांगितलं 'भारी' लॉजिक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 11:20 AM

Open in App
1 / 9

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित झाल्याची घोषणा केली अन् त्यानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमाचा मार्ग मोकळा झाला.

2 / 9

आयपीएलचे गव्हर्निंग काऊन्सिलचे चेयरमन ब्रिजेश पटेल यांनी आयपीएल संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणार असल्याचे जाहीर केले. यंदाची आयपीएल ही भारताबाहेर होणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर आता पुढील आठवडयात वेळापत्रकही जाहीर केले जाईल, असे पटेल यांनी सांगितले.

3 / 9

यूएईत होणाऱ्या आयपीएलचे जेतेपद कोण पटकावेल, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे जेतेपदाच्या शर्यतीत नेहमी आघाडीवर राहणारे संघ आहेत.

4 / 9

''RCBकडे तगड्या फलंदाजांची फौज आहे. त्यात जर सीमारेषा लांब असतील तर गोलंदाजाची बाजू कमकुवत असूनही संघाला फाट फटका बसण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे यूएईत RCBचांगली कामगिरी करेल,''असेही चोप्रा म्हणाला.

5 / 9

RCBला अजून एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. 2009, 2011 आणि 2016मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

6 / 9

माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट समालोचक आकाश चोप्रानं यंदाची आयपीएल RCB जिंकण्याचे चान्स अधिक असल्याचे मत व्यक्त केलं आहे.

7 / 9

यू ट्यूब चॅनलवर बोलताना चोप्रानं त्यामागचं कारणही सांगितलं. तो म्हणाला,''यूएई आणि भारत येथील खेळपट्टी ही फलंदाजांसाठी फलदायी आहे. पण, येथील सीमारेषा या लांब आहेत आणि त्याचा फायदा RCBला मिळेल. त्यांची गोलंदाजीची फळी कमकुवत आहे.''

8 / 9

''RCBकडे तगड्या फलंदाजांची फौज आहे. त्यात जर सीमारेषा लांब असतील तर गोलंदाजाची बाजू कमकुवत असूनही संघाला फाट फटका बसण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे यूएईत RCBचांगली कामगिरी करेल,''असेही चोप्रा म्हणाला.

9 / 9

यूएईत फिरकीपटूंचा दबदबा जाणवेल. चेन्नई सुपर किंग्स ( CSK) संघाकडे दर्जेदार फिरकी गोलंदाज आहेत.

टॅग्स :आयपीएल 2020संयुक्त अरब अमिरातीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहली