Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL 2024: यंदाचा IPL हंगाम विविध कारणांनी खास; ४ संघांनी बदलले कर्णधार, वाचा सविस्तरIPL 2024: यंदाचा IPL हंगाम विविध कारणांनी खास; ४ संघांनी बदलले कर्णधार, वाचा सविस्तर By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 4:55 PMOpen in App1 / 10आज शुक्रवारपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात होत आहे. सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे. यंदाचा आयपीएल हंगाम विविध कारणांनी खास असणार आहे.2 / 10या हंगामासाठी चार संघांनी आपले कर्णधार बदलले आहेत. तर दुखापतीमुळे मागील हंगामाला मुकलेल्या काही कर्णधारांचे पुनरागमन झाले आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यातील सामन्याने यंदाच्या हंगामाला प्रारंभ होत आहे.3 / 10चेन्नई सुपर किंग्ज प्रथमच ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार आहे. तर दिल्ली कॅपिटल्सच्या संघात रिषभ पंतचे पुनरागमन झाले आहे. हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्सच्या संघात घरवापसी झाली असून त्याला कर्णधार बनवण्यात आले आहे. 4 / 10पंत मोठ्या कालावधीनंतर मैदानात दिसणार आहे. त्याने शेवटचा आयपीएल सामना २०२२ मध्ये खेळला होता. यानंतर कार अपघातात तो गंभीर जखमी झाला. पंतने ९८ आयपीएल सामन्यांमध्ये २८३८ धावा केल्या आहेत.5 / 10खरं तर यंदाचा हंगाम आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा असणार आहे. देशात लोकसभा निवडणूक होत आहे. यामुळे स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले नाही. यंदाच्या हंगामातील सुरुवातीच्या केवळ २१ सामन्यांचे वेळापत्रक समोर आले आहे. 6 / 10२२ मार्चपासून सुरू होत असलेल्या या हंगामातील अंतिम सामना २६ मे रोजी होण्याची शक्यता आहे. महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे ऋतुराजच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असेल. 7 / 10गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सने देखील कर्णधार बदलला आहे. मुंबईने हार्दिक पांड्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे, तर गुजरातचे कर्णधारपद शुबमन गिलला देण्यात आले आहे. 8 / 10ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीने आपल्या संघाचा कर्णधार बनवले आहे. मुंबई, गुजरात, चेन्नई आणि हैदराबाद या चार संघांनी आपला कर्णधार बदलला आहे.9 / 10पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात २३ तारखेला सामना होणार आहे. हा सामना चंदीगड येथील नवीन स्टेडियमवर होणार आहे. यादविंद्र सिंह क्रिकेट स्टेडियम असे या मैदानाला नाव देण्यात आले आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानात ३६००० प्रेक्षक बसू शकतात. 10 / 10आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मैदानात दिसणार आहे. मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने २४.७५ कोटी रूपयांमध्ये खरेदी केले. याशिवाय आयपीएलमधील दुसरा महागडा खेळाडू पॅट कमिन्स हैदराबादच्या जर्सीत दिसणार आहे. कमिन्सला SRH च्या फ्रँचायझीने २०.५० कोटी देऊन आपल्या ताफ्यात घेतले. आणखी वाचा Subscribe to Notifications