Join us  

IPL स्पर्धांमुळे आयुष्यच बदललं, या खेळाडूंना मिळाली 'लाइफलाइन'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 1:25 PM

Open in App
1 / 10

आयपीएल युवा खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय पातळी गाठण्याचा मार्ग आहे. या लीगद्वारे बुमराह आणि हार्दिकसारखे स्टार गवसले.

2 / 10

भारतीय संघात पुनरागमनाचे दरवाजेही याच लीगने उघडले. याचे सर्वोत्तम उदाहरण अजिंक्य रहाणे आहे. यंदाच्या सत्रात कारकिर्दीला संजीवनी मिळालेले खेळाडू कोण, याचा शोध घेऊया...

3 / 10

अजिंक्य रहाणे : मुंबईविरुद्ध २७ चेंडूत ६१ आणि केकेआरविरुद्ध २९ चेंडूत ७१ धावांचा पाऊस पाडणारा अजिंक्य इतका आक्रमक कधीही नव्हता. २०२० नंतर १९ चेंडूत त्याने आयपीएलचे पहिले अर्धशतक ठोकले

4 / 10

बीसीसीआयने करार नाकारणाऱ्या या खेळाडूला सीएसकेने ५० लाखांत स्वीकारले. तो २०१६ ला अखेरचा टी-२० सामना खेळला होता. ५ सामने, २०९ धावा, २ अर्धशतके, स्ट्राइक रेट १९९.०५

5 / 10

मोहित शर्मा : ३४ वर्षांचा हा वेगवान गोलंदाज ३ वर्षांनंतर लीगमध्ये परतला आणि गुजरातसाठी हिरो ठरला. २०२० ला एकच सामना खेळल्यानंतर पुढील काही सत्रात तो एकाही संघात नव्हता.

6 / 10

लखनौविरुद्ध त्याने १२ धावांचा यशस्वी बचाव केला. २०२२ ला नेट गोलंदाज असलेल्या मोहितला गुजरातने यंदा ५० लाखांत संघात घेतले. ३ सामने, ४ बळी, उत्कृष्ट २/१७, इकॉनाॅमी ४.६७

7 / 10

पीयूष चावला : २०२१ ला केवळ एक सामना खेळणारा पीयूष यंदा मुंबईसाठी प्रत्येक सामना खेळतो. २०२२ ला अनसोल्ड होता. २००६ ला आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या या फिरकीपटूने २०१२ ला अखेरचा सामना खेळला होता

8 / 10

इतकी वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहूनदेखील पीयूषने यंदा भेदकता सिद्ध केली. ६ सामने, ९ बळी, उत्कृष्ट ३/२२, इकॉनाॅमी ६.८७

9 / 10

अमित मिश्रा : लखनौचा स्टार फिरकीपटू अमितला २०२२ ला कुणीही खरेदी केले नव्हते. यंदा या संघाने त्याला ५० लाखांत स्वत:कडे घेतले. आयपीएल इतिहासात सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या ४० वर्षांच्या अमितने भारताकडून २०१६ ला अखेरचा सामना खेळला होता. ४ सामने, ४ बळी, उत्कृष्ट २/२३, इकॉनाॅमी ६.५०

10 / 10

संदीप शर्मा : राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा जखमी असल्याने संदीप शर्माला संधी मिळाली. त्याआधी लिलावात त्याला कुणी खरेदी केले नव्हते. पॉवर प्ले आणि डेथ ओव्हरमध्ये तो उपयुक्त मारा करतो. सीएसकेविरुद्ध अखेरच्या तीन चेंडूवर सात धावांचा बचाव करताना संदीपने तीन यॉर्कर टाकून धोनी-जडेजा जोडीला रोखले होते. ५ सामने, ७ बळी, उत्कृष्ट २/२५, इकॉनाॅमी ८.२१

टॅग्स :हार्दिक पांड्याजसप्रित बुमराहआयपीएल २०२३
Open in App