Join us  

IPL Mega Auction 2022 : खेळाडूंचे भाव वाढवले, इतर संघांचे खिसे केले रिकामे; हा 'दिल्लीकर' मास्टरमांईंड आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 1:00 PM

Open in App
1 / 11

१२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएलचं मेगा ऑक्शन (IPL Mega Auction 2022) पार पडलं. यावेळी सर्वात आधी ज्या संघानं आपली रक्कम खर्च केली ती म्हणजे दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals). संपूर्ण लिलाव पाहिल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाचे खूप कौतुक केले जात आहे.

2 / 11

या संघाने कमी किमतीत आपल्या संघात लिलावात सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश केला. एवढेच नाही तर ज्या खेळाडूंना दिल्लीच्या संघांना घ्यायचंही नव्हतं, त्यांच्यासाठीही दिल्लीनं बोली लावत त्यांची किंमत वाढवली.

3 / 11

यामुळे अन्य संघांना अधिक पैसे देऊन हे खेळाडू विकत घ्यावे लागले. या रणनीतीचा इतर संघांच्या बजेटवरही परिणाम परिणामी त्यांना खेळाडूंसाठी अधिक खिसा रिकामा करावा लागला.

4 / 11

दिल्लीच्या सर्वोत्तम खेळाडूंना खरेदी करण्याच्या या डावपेचामागे किरणकुमार गांधी यांचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. गांधींच्या रणनीतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. जिथे एकीकडे MI आणि CSK चे चाहते गांधींना खूप संताप व्यक्त करताना दिसत आहेत, त्याचबरोबर अनेक यूजर्स त्यांचे कौतुकही करत आहेत.

5 / 11

दिल्ली कॅपिटल्सची मालकी GMR ग्रुप आणि JWS ग्रुप या दोन मोठ्या कंपन्यांकडे आहे. किरण कुमार गांधी हे GMR समूहाचे CEO, MD आणि संचालक आहेत. जवळजवळ प्रत्येक हंगामात, गांधी त्यांच्या संघाच्या वतीने लिलावात बोली लावतात, परंतु यावेळी त्यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

6 / 11

गेल्या अनेक हंगामांपासून, गांधी डीसीसाठी एक चांगला संघ तयार करण्याचे काम करत आहेत आणि यावेळी त्यांनी ज्या पद्धतीने खेळाडूंची निवड केली आहे. त्यावरून ते त्यात यशस्वीही झाल्याचं दिसतं.

7 / 11

गांधी दिल्ली कॅपिटल्सचे को-ओनर आहेत आणि संघ व्यवस्थापनाचं कामही ते पाहतात. किरण गांधी यांनी उस्मानिया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

8 / 11

ट्विटरवर गांधी यांच्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक त्यांच्या बिझनेसमन माइंडची स्तुती करत आहेत, तर काही त्याची तुलना प्रीती झिंटाशी करत आहेत.

9 / 11

गेल्या अनेक सीझनमध्ये प्रीती झिंटा ज्या पद्धतीने बोली लावून खेळाडूंच्या किमती वाढवत असे, त्याच पद्धतीने गांधी करत असल्याचे युजर्सचं म्हणणं आहे. परंतु प्रिती झिंटाच याबाबत उत्तम असल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे.

10 / 11

दोन्ही दिवशी गांधींनी उत्तम रणनीती अवलंबली असली तरी तेही एका बोलीत अडकले. खलील अहमद याच्यावर बोली लावल्यानंतर गांधींना सर्वाधिक ट्रोल करण्यात आलं. वास्तविक, खलीलवर बोली लागली होती आणि मुंबई इंडियन्सदेखील बोली लावत होती.

11 / 11

दरम्यान, यावेळी गांधींनीही मध्येच या बोलीत सहभाग घेतला. याचा परिणाम असा झाला की खलीलची किंमत पाहताच ५.२ कोटींवर पोहोचली. यावेळी एमआयनं पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. मग काय गांधींचा डाव उलटला आणि खलील ५.२ कोटींमध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये सहभागी झाला. या संपूर्ण घटनेवरून किरण गांधींना खूप ट्रोल केलं गेलं.

टॅग्स :आयपीएल लिलावदिल्ली कॅपिटल्समुंबई इंडियन्स
Open in App