IPL PBKS vs RR: प्रीती झिंटासह या 'पंजाबी कुडी'नं लुटली मैफिल, इथं पाहा Viral Pics

पंजाब विरुद्ध राजस्थान यांच्यातील सामन्या दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री आणि पंजाब संघाची सह मालकीण प्रीती झिंटासह नव्या मिस्ट्री गर्लनं लुटली मैफिल

चंदीगड येथील मुल्लानपूर स्टेडियमवर रंगलेल्या पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात प्रीती झिंटाची झलकही पाहायला मिळाली. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच पंजाबची सह मालकीण आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टँडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले.

पंजाब विरुद्धच्या संघाला चीअर करताना प्रीतीनं आपल्या खास अदाकारीनं मैफिल लुटल्याचे पाहायला मिळाले.

पोस्ट मॅच प्रेझेंटेशन वेळीही प्रीती झिंटानं आपल्या खास अदाकारीची झलक दाखवून दिली. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

या आधीही प्रीती झिंटा आपल्या सह मालकीच्या संघाला चीअर करण्यासाठी स्टेडियमवर आल्याचे पाहायला मिळाले आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबच्या संघानं यंदाच्या हंगामात दमदार सुरुवात करताना पहिलेदोन सामने जिंकले होते. पण प्रीती ज्या सामन्यात दिसली त्या सामन्यात पंजाबची टीम फसली. त्यामुळे ती आली अन् संघ ट्रॅकवर घसरला अशा आशयाच्या काही समेंट्सही पाहायला मिळत आहेत.

सामन्या दरम्यान प्रीतीच्या चेहऱ्यावर 'कभी खुशी.. कभी गम' असे भाव पाहायला मिळाले.

पंजाबची सह मालकीण प्रीती झिंटाशिवाय या पंजाबी कुडीनंही सामन्यावेळी लक्षवेधून घेतले. पंजाबच्या जर्सीत दिसेल्या या तरुणीनं यशस्वी जैस्वालच्या विकेटनंतर हटके अंदाजात केलेले सेलिब्रेशनही चर्चेचा विषय ठरत आहे.

सामन्यादरम्यान पंजाब संघाच्या विरोधात काही घडलं तर तिच्या चेहऱ्यावरील हावभाव बघम्याजोगी होती. सह मालकीण प्रीतीपेक्षा ती अधिक काळजीत दिसली.

मार्को यान्सेन याने कॅच ड्रॉप केल्यावर ती चांगलीच चिडल्याचे पाहायला मिळाली. तिच्या ही रिअ‍ॅक्शन पाहून ही नवी मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडल्याचे दिसते.