प्रीती झिंटा, पंजाबचा संघ अन् सह मालकासोबत तिच्या 'वादग्रस्त मालिके'ची गोष्ट

पंजाब किंग्स संघाची मालकीण प्रीती झिंटा पुन्हा एकदा सह संघ मालकासोबतच्या वादामुळे चर्चेत आली आहे.

पंजाब किंग्स संघाची मालकीण प्रीती झिंटा पुन्हा एकदा सह संघ मालकासोबतच्या वादामुळे चर्चेत आली आहे.

केपीएल ड्रीम क्रिकेट प्रायव्हेड लिमिटेडमधील हिस्सेदारीच्या मुद्यावरून प्रीती झिंटानं आयपीएलमधील आपल्या पंजाब संघाच्या सह मालकाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.

पंजाबचा संघ प्रीती झिंटा आणि संघ मालक यांच्यातील वादाची ही काही पहिली घटना नाही. याआधी प्रीती आणि सह संघ मालक यांच्यातील वादाचे प्रकरण चांगलेच गाजलं होते.

२००५ मध्ये प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यात सुरु झालेला प्रेमाचा खेळ अन् ब्रेकअपनंतरचा वाद यामुळेही आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेटशी कनेक्ट असणारा चेहरा चर्चेत राहिला आहे.

प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांनी २००८ मध्ये एकत्र मिळूनच पंजाब किंग्सचा संघ खरेदी केला.

आयपीएल फ्रँचायझी संघाच्या मालकीशिवाय दोघांच्यात वाजतं असणारे प्रेमाचं गाणं आणखी हिट होईल, असे वाटत असताना त्यांच्यात ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतरही दोघांनी व्यावसायिक संबंध कायम ठेवले.

२०१४ मध्ये प्रीतीनं नेस वाडिया यांच्या विरोधात गंभीर आरोप केल्याचा सीनही घडला होता. हे प्रकरणही कोर्टापर्यंत पोहचले होते.

प्रीती झिंटा हिने आपली तक्रार मागे घेतल्यानंतर २०१८ मध्ये मुंबई कोर्टाने संबंधित प्रकरण रद्द केले होते.

आयपीएलच्या मेगा लिलावाआधी आता शअर्सच्या मुद्यावरुन प्रीती झिंटा आणि मोहित बर्मन यांच्यातील सामना चर्चेचा विषय ठरत आहे.