Cricket Buzz»फोटो गॅलरी »प्रीती झिंटा, पंजाबचा संघ अन् सह मालकासोबत तिच्या 'वादग्रस्त मालिके'ची गोष्टप्रीती झिंटा, पंजाबचा संघ अन् सह मालकासोबत तिच्या 'वादग्रस्त मालिके'ची गोष्ट By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 2:38 PMOpen in App1 / 9पंजाब किंग्स संघाची मालकीण प्रीती झिंटा पुन्हा एकदा सह संघ मालकासोबतच्या वादामुळे चर्चेत आली आहे. 2 / 9केपीएल ड्रीम क्रिकेट प्रायव्हेड लिमिटेडमधील हिस्सेदारीच्या मुद्यावरून प्रीती झिंटानं आयपीएलमधील आपल्या पंजाब संघाच्या सह मालकाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.3 / 9पंजाबचा संघ प्रीती झिंटा आणि संघ मालक यांच्यातील वादाची ही काही पहिली घटना नाही. याआधी प्रीती आणि सह संघ मालक यांच्यातील वादाचे प्रकरण चांगलेच गाजलं होते. 4 / 9२००५ मध्ये प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यात सुरु झालेला प्रेमाचा खेळ अन् ब्रेकअपनंतरचा वाद यामुळेही आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेटशी कनेक्ट असणारा चेहरा चर्चेत राहिला आहे.5 / 9 प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांनी २००८ मध्ये एकत्र मिळूनच पंजाब किंग्सचा संघ खरेदी केला. 6 / 9आयपीएल फ्रँचायझी संघाच्या मालकीशिवाय दोघांच्यात वाजतं असणारे प्रेमाचं गाणं आणखी हिट होईल, असे वाटत असताना त्यांच्यात ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतरही दोघांनी व्यावसायिक संबंध कायम ठेवले.7 / 9२०१४ मध्ये प्रीतीनं नेस वाडिया यांच्या विरोधात गंभीर आरोप केल्याचा सीनही घडला होता. हे प्रकरणही कोर्टापर्यंत पोहचले होते. 8 / 9प्रीती झिंटा हिने आपली तक्रार मागे घेतल्यानंतर २०१८ मध्ये मुंबई कोर्टाने संबंधित प्रकरण रद्द केले होते. 9 / 9 आयपीएलच्या मेगा लिलावाआधी आता शअर्सच्या मुद्यावरुन प्रीती झिंटा आणि मोहित बर्मन यांच्यातील सामना चर्चेचा विषय ठरत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications