Join us  

IPL retention rules: नव्या संघांना दिली 'खास' पॉवर, जाणून घ्या माजी संघांत किती व कोणकोणते खेळाडू राहतील कायम!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 3:33 PM

Open in App
1 / 12

Indian Premier League 2022 - आयपीएलचे १५वे पर्व आणखी धमाकेदार होणार आहे. लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझींचा समावेश झाल्यानंतर IPL 2022मध्ये आता दहा संघ खेळणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळे आता आयपीएल २०२२साठी Auction होणार आहे आणि त्यासाठीचे नियम बीसीसीआयनं जाहीर केले आहेत. या नियमानुसार आधीच्या ८ संघांना जास्तीत जास्त ४ खेळाडूंना संघात कायम राखता येणार आहे आणि नव्यानं दाखल झालेल्या दोन फ्रँचायझींना ऑक्शनच्या आधी तीन खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेता येणार आहे.

2 / 12

IPL 2022चं Mega-Auction जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ( January 1st week ) होणार असल्याची माहिती मिळत आहे आणि ८ फ्रँचायझींना त्यांच्या ४ रिटेन ( 4 retained ) खेळाडूंची नावं डिसेंबरपर्यंत द्यायची आहे. ऑक्शनसाठी प्रत्येक संघांला ९० कोटी पर्स ठरवण्यात आली आहे. मागच्या पर्वापेक्षा पाच कोटी वाढवण्यात आले आहेत.

3 / 12

रिटेशन नियमानुसार प्रत्येक संघाला तीन भारतीय आणि एक परदेशी किंवा दोन भारतीय व दोन परदेशी असे एकूण चार खेळाडू कायम राखता येणार आहेत. संघात कायम राहणारे भारतीय खेळाडू हे राष्ट्रीय संघाचे नेतृत्व केलेले किंवा न केलेले किंवा मिश्र असे असायला हवेत. २०१८च्या आयपीएलमधील राईट टू मॅच right-to-match cards (RTM) कार्ड यंदा नसणार आहे.

4 / 12

मुंबई इंडियन्स व त्यांचे चार खेळाडू - रोहित शर्मा, इशान किशन, जसप्रीत बुमराह व किरॉन पोलार्ड/ट्रेंट बोल्ट

5 / 12

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व त्यांचे चार खेळाडू - विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, ग्लेन मॅक्सवेल व मोहम्मद सिराज/ हर्षल पटेल

6 / 12

चेन्नई सुपर किंग्स व त्यांचे चार खेळाडू - महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा व मोईन अली/फॅफ ड्यू प्लेसिस

7 / 12

दिल्ली कॅपिटल्स व त्यांचे चार खेळाडू - रिषभ पंत, पृथ्वी शॉ, शिखर धवन/ श्रेयस अय्यर व कागिसो रबाडा

8 / 12

कोलकाता नाइट रायडर्स व त्यांचे चार खेळाडू - शुबमन गिल, वेंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक व ल्युकी फर्ग्युसन

9 / 12

सनरायझर्स हैदराबाद व त्यांचे चार खेळाडू - केन विलियम्सन, जॉनी बेअरस्टो, वृद्धीमान सहा, मनिष पांडे

10 / 12

राजस्थान रॉयल्स व त्यांचे चार खेळाडू - संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, जोफ्रा आर्चर, जोस बटलर

11 / 12

पंजाब किंग्स व त्यांचे चार खेळाडू - मोहम्मद शमी, शाहरूख खान, मयांक अग्रवाल व अर्षदीप सिंग

12 / 12

पंजाब किंग्सचा कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) यानं रिलिज करण्याची मागणी फ्रँचायझीकडे केली आहे. तर श्रेयस अय्यरला पुन्हा दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनायचे आहे, परंतु त्याची ही मागणी मान्य होणे अवघड आहे. त्यामुळे या दोघांसाठी चढाओढ पाहायला मिळेल.

टॅग्स :आयपीएल २०२१हार्दिक पांड्यालोकेश राहुलविराट कोहलीरोहित शर्मा
Open in App