IPL vs PSL: मुल्तान संघ नावाचाच 'सुल्तान'; आयपीएलच्या तुलनेत PSLमध्ये मिळणाऱ्या बक्षीस रकमेत जमीन-आसमानाचा फरक

मुल्तान सुल्तान संघानं पाकिस्तान सुपर लीगच्या 2021च्या पर्वाचे जेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम सामन्यात फेशावर झाल्मीला नमवून प्रथमच PSLचा चषक उंचावला.

मुल्तान सुल्तान संघानं पाकिस्तान सुपर लीगच्या 2021च्या पर्वाचे जेतेपद पटकावले. त्यांनी अंतिम सामन्यात फेशावर झाल्मीला नमवून प्रथमच PSLचा चषक उंचावला.

क्वालिफायर 1मध्ये त्यांनी इस्लामाबाद युनायटेड संघाला नमवून प्रथमच फायनलमध्ये प्रवेश केला होता. मुल्तान सुल्ताननं 206 धावा कुटल्या. सोहैब मक्सूदनं 35 चेंडूंत नाबाद 65 धावा आणि रिली रोसोव यानं 21 चेंडूंत 50 धावा चोपून मुल्तान सुल्तानला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर इम्रान ताहीर व जलदगती गोलंदाज शानवाज धानी, सोहैल तन्वीर आणि इम्रान खान यांनी त्यांची कामगिरी चोख बजावताना संघाला 47 धावांनी विजय मिळवून दिला.

मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ पहिल्या टप्प्यात गुणतालिकेत तळाला होता आणि त्यानंतर अबु धाबी येथे झालेल्या टप्प्यात जबरदस्त कमबॅक केले. विजेत्या मुल्तान सुल्तान संघाला ३.५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कमही मिळाली. आयपीएलच्या तुलनेत ही रक्कम किती कमी आहे, हे माहित्येय?

कोरोना व्हायरसमुळे आयपीएलमधील बक्षीस रक्कमही ५० टक्क्यांनी कमी केली आहे. त्यामुळे आयपीएल २०२१तील विजेत्या संघाला १० कोटींचे बक्षीस मिळणार आहे. याआधी ही बक्षीस रक्कम २० कोटी इतकी होती.

उपविजेत्या पेशावर झाल्मी संघाला १.५ कोटींची बक्षीस रक्कम मिळाली, आयपीएलमधील विजेत्याला यंदा १२.५ कोटींऐवजी ६.२५ कोटी इतकी बक्षीस रक्कम मिळणार आहे.

याशिवाय अन्य बक्षीस रक्कमेतही जमीन-आसमानाचा फरक आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या सोहैब मक्सूदला १४.१ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले, तर आयपीएलमध्ये Most Valuable Player ला १० लाख रुपये दिले जातात.

आयपीएलमधील सर्वोत्तम फलंदाज व सर्वोत्तम गोलंदाज यांना प्रत्येकी १० लाखांचे बक्षीस दिले जाते. पाकिस्तान सुपर लीगमध्ये सर्वोत्तम गोलंदाज शाहनवाज धाणीला ३.७५ लाख आणि सर्वोत्तम गोलंदाज सोहैब मक्सूदला ३.७५ लाख दिले गेले.

सर्वोत्तम क्षेत्ररक्षक इफ्तिखार अहमदलाही ३.७५ लाख देण्यात आले, तर सर्वोत्तम यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानलाही ३.७५ लाख दिले गेले.