Join us  

रोहित शर्माच्या हातातील ट्रॉफी प्लॅटिनमची की चांदीची? खरी की रिप्लिका? मोठी माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 2:53 PM

Open in App
1 / 8

टीम इंडिया आज दिल्लीत पोहोचली आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन विश्वविजेता संघ मुंबईकडे जल्लोषासाठी रवाना झाला आहे. रोहित शर्मा आणि द्रविडने मोदींच्या हातात ट्रॉफी ठेवली. रोहित वेस्ट इंडिजहून घेऊन आलेली ट्रॉफी ही प्लॅटीनमची नाही तर चांदीची आहे. या ट्रॉफीबाबत महत्वाची माहिती येत आहे.

2 / 8

वर्ल्डकपची ट्रॉफीतर सोन्याची असते. मग भारतीय संघाला सिल्व्हर रंगाची ट्रॉफी का दिली गेली? असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. अनेकांना वाटले असेल ती व्हाईट गोल्डची आहे. परंतू नाही ती ट्रॉफी व्हाईट गोल्डची नाही. ती चांदीचीच आहे. मग सोन्याची आणि चांदीची ट्रॉ़फी कधी कधी दिली जाते? चला पाहुया...

3 / 8

मुख्य वर्ल्डकप असेल तेव्हा सोन्या, चांदीची ट्रॉफी विजेत्या संघाला दिली जाते. टी २० वर्ल्डकपच्या ट्रॉफीमध्ये सोन्याचा वापर होत नाही. ही ट्रॉफी चांदी आणि रोडिअमचा वापर करून तयार केली जाते. वनडे वर्ल्डकपवेळी सोन्या चांदीची ट्रॉफी असते. यामुळे रोहितकडे जी ट्रॉफी आहे ती चांदीची आहे.

4 / 8

या विश्वचषकाचे वजन ७ किलो आहे. तर त्यांची उंचीही साधारण ५१ सेमी एवढी आहे. आता ही ट्रॉफी कोणाकडे राहणार, रोहित शर्माकडे की बीसीसीआयकडे की आयसीसीकडे?

5 / 8

वर्ल्डकपची मुख्य ट्रॉफी ही कधीही खेळाडूंना दिली जात नाही. तर ती आयसीसीकडेच असते. त्याची रिप्लिका ट्रॉफी टीमला दिली जाते. यानुसार आता जी रोहितकडे आलेली ट्रॉफी आहे ती खऱ्या ट्रॉफीची रिप्लिका आहे. ही रिप्लिका बीसीसीआय आपल्याकडेच ठेवणार आहे.

6 / 8

रिप्लाका देखील खेळाडूंना दिली जाणार नाही. तर जी मेडल मिळालेली आहेत ती खेळाडूंना आपल्याकडे ठेवता येणार आहेत.

7 / 8

आज संध्याकाळी रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर येईल. इथे खेळाडूंच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडेल. याशिवाय सायंकाळी ५ वाजल्यापासून मरीन ड्राईव्हवर विजय यात्रा आणि वानखेडेवर महोत्सव साजरा केला जाणार आहे.

8 / 8

आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांना मोफत एन्ट्री मिळणार आहे. गेट नंबर २, ३ आणि ४ मधून दुपारी चार वाजल्यापासून चाहत्यांना वानखेडेमध्ये प्रवेश मिळणार आहे.

टॅग्स :रोहित शर्माट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024बीसीसीआय