Join us

Ishan Kishan : खूप बोल्ड आणि ब्युटिफूल आहे इशान किशनची गर्लफ्रेंड, जिंकलेय सुपरनॅचरलचे विजेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 16:00 IST

Open in App
1 / 9

IndVsEng : पहिल्या टी-२० लढतीत इंग्लंडकडून दारुण पराभव झाल्यानंतर दुसऱ्या टी-२० लढतीत भारतीय संघाने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला होता. या सामन्यात पदार्पणवीर युवा फलंदाज इशान किशव भारताच्या विजयाच्या शिल्पकार ठरला. त्यावने शानदार अर्धशतकी खेळी करत सुरुवातीलाच सामना भारताच्या दिशेने फिरवला होता.

2 / 9

दरम्यान, पहिल्याच लढतीत सामनावीराचा पुरस्कार जिंकत भारताला विजय मिळवून देणाऱ्या इशान किशनचे नाव गेल्या अनेक दिवसांपासून मॉडेल अदिती हुंडिया हिच्याशी जोडले जात आहे.

3 / 9

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या इशानने पदार्पणातील लढतीतच जोरदार धमाका करत आपल्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान, सध्या त्याचे नाव अदिती हुंडिया हिच्याशी जोडले जात असून, अदितीसुद्धा सोशल मीडियावर नेहमीच इशान किशनचे कौतुक करताना दिसून येत आहे.

4 / 9

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यातून पदार्पण करणाऱ्या इशान किशनला अदितीने खास अंदाजात शुभेच्छा दिल्या होत्या. तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत शुभेच्छा माझ्या क्युटी, अशा शब्दात इशानचे कौतुक केले होते.

5 / 9

अदिती हुंडिया हिचा जन्म १५ जानेवारी १९९७ रोजी राजस्थानमधील जयपूर येथे झाला होता.

6 / 9

अदिती हुंदिया २०१९ च्या आयपीएलदरम्यान चर्चेत आली होती. त्यावेळी मुंबईने चेन्नईला नमवत विजेतेपद पटकावले होते. त्यानंतरच इशानचे नाव अदितीसोबत जोडले जाऊ लागले होते.

7 / 9

अदितीने आपल्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात २०१६ मध्ये एलिट मिस राजस्थानमधून केली होती. त्या स्पर्धेत ती दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती. त्यानंतर तिने फेमिना मिस इंडिया राजस्थानचे विजेतेपद पटकावले होते. तसेच फेमिना मिस इंडिया २०१७ मध्ये ती पहिल्या १५ स्पर्धकांमध्ये राहिली होती.

8 / 9

अदितीने २०१८ मध्ये सुपरनॅचरलचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर तिला मिस युनिव्हर्स २०१८ मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती.

9 / 9

टॅग्स :इशान किशनभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंड