डिलीट कर नाहीतर...! Ishan Kishan च्या कथित गर्लफ्रेंडच्या फोटोवरील कमेंट चर्चेत

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर इशान किशन फिल्डबाहेरील गोष्टीमुळेही चर्चेत असतो. त्याचे नाव अदिती हुंडिया या मॉडेलशी जात आहे.

अदिती हुंडिया ही एक मॉडेल असून ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय असल्याचे दिसते. सातत्याने ती पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांश कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते.

तिने इन्स्टाग्रामवरुन एखादी पोस्ट शेअर केली की, त्यावर इशान किशन संदर्भातील कमेंट हमखास पाहायला मिळते.पुन्हा एकदा त्याची झलक पाहायला मिळाली आहे.

अदितीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरु काही खास फोटो शेअर केले आहेत. यात तिचा हॉट अँण्ड ब्यूटीफूल अंदाज पाहायला मिळत आहे.

तिचे नवे फोटो शेअर केल्यावर अपेक्षेप्रमाणे इशान किशनसंदर्भातील कमेंट्स त्यावरून दिसू लागल्या. यात एक पोस्ट एकदमच खास आणि चर्चेचा विषय ठरतीये.

एका नेटकऱ्याने इशान किशन सध्या रणजी ट्रॉफीसाठीच्या स्पर्धेत व्यग्र असल्यानं तो तुझा फोटोंना मॅच झाल्यावर लाईक करेल, अशी मजेशीर कमेंट दिलीये.

दुसऱ्या एका वापरकर्त्यांनी तिच्या हॉट अंदाजाकडे लक्षवेधून तुझा हा अवतार इशान किशनला आवडणार नाही, अशी कमेंट दिल्याचे पाहायला मिळते. एवढेच नाही तर फोटो लगेच डिलीच करून टाक, नाहीतर इशान भय्याला राग येईल, असा उल्लेखही यात करण्यात आला आहे. ही कमेंट अधिक लक्षवेधी ठरताना दिसत आहे.

क्रिकेटर इशान किशन आणि अदिती यांच्यात डेटिंगचा खेळ सुरु असल्याची चर्चा रंगत असली तरी दोघांनी कधीही उघडपणे नात्याबद्दल कोणतेही भाष्य केलेले नाही.