Cricket Buzz»फोटो गॅलरी »कसोटीत 141 वर्षांत प्रथमच घडलं असं!कसोटीत 141 वर्षांत प्रथमच घडलं असं! By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 1:05 PMOpen in App1 / 9इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत यजमान श्रीलंकेवर मात करून मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. पाचव्या दिवशी इंग्लंडने यजमानांच्या शेवटच्या तीन फलंदाजांना बाद करताना 57 धावांनी विजय मिळवला. 2 / 9सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडने अवघ्या 30 मिनिटांत श्रीलंकेच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले.3 / 9फिरकीपटू लीच ( 5/83) याने मलिंदा पुष्पकुमार (1) ची विकेट घेत इंग्लंडचा विजय निश्चित केला. 4 / 9मोईन अलीने लीचला उत्तम साथ देताना 72 धावांत 4 विकेट घेतल्या. 301 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 243 धावांत माघारी परतला.5 / 9श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूज ( 88) आणि दिमुथ करुणारत्ने (57) यांनी अर्धशतकी खेळी केली, तर रोशन सिल्वा ( 37) आणि निरोशन डिकवेला (35) यांनीही संघर्ष दाखवला.6 / 9या कसोटीत 40 पैकी 38 विकेट्स या फिरकी गोलंदाजांनी घेतल्या. 141 च्या कसोटी इतिहासात असे प्रथमच घडले आहे. श्रीलंकेच्या जलदगती गोलंदाज सुरंगा लकमलने एक विकेट घेतला, तर एक फलंदाज धावबाद झाला. 7 / 9इंग्लंडच्या लीच, मोईन अली आणि आदिल रशिद या फिरकीपटूंनी 20पैकी 19 विकेट घेतल्या. कर्णधार जो रुटने 124 धावांची उपयुक्त खेळी केली. 8 / 9दक्षिण आफ्रिकेतील 2015-16च्या कसोटी विजयानंतर इंग्लंडने परदेशात मिळवलेला हा पहिला कसोटी मालिक विजय आहे. 9 / 9इंग्लंडने 2001 मध्ये श्रीलंकेत अखेरचा मालिका विजय मिळवला होता. 17 वर्षांनंतर इंग्लंडने श्रीलंकेला त्यांच्याच घरात पराभूत केले. आणखी वाचा Subscribe to Notifications