कुणी येणार गं! जसप्रीत बुमराह-संजना गणेसन 'आई-बाबा' होणार, जाणून घ्या लव्ह स्टोरी

आशिया चषक स्पर्धेतील नेपाळविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) खेळणार नाही. जसप्रीत तातडीने रविवारी कोलंबो येथून मुंबईसाठी रवाना झाला आहे.

जसप्रीतच्या मुंबईत परतण्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे सुरुवातीला सांगितले गेले. त्याच्या घरी गोड बातमी येणार असल्याने तो मुंबईत परतला आहे. जसप्रीत आणि त्याची पत्नी संजना गणेसन हे आई-बाबा होणार आहेत. आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी जसप्रीत मुंबईत परतला आहे.

जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) १५ मार्च २०२१ ला स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्यासोबत विवाह बंधनात अडकला होता. संजना गणेसन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे.

संजनाने २०१९च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर २०१३-१४मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं.

स्पोर्ट्स प्रेझेंटर बनण्यापूर्वी संजनानं २०१२मध्ये 'Femina Style Diva’ फॅशन शो आणि २०१३मध्ये 'Femina Miss India Pune’ यात सहभाग घेतला होता. त्याच वर्षी तिनं Femina Officially Gorgeous Competition' मध्ये सहभाग घेतला. २०१४ मध्ये झालेल्या मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत संजनानं प्रवेश केला होता.

संजना MTV Splitsvilla 7 मधून टेलेव्हिजनवर पदार्पण केलं होतं, परंतु तिला दुखापतीमुळे ही मालिका सोडावी लागली. त्यानंतर तिनं आयपीएलमध्ये अँकर म्हणून काम सुरू केलं आणि तेथेच जसप्रीतसोबत तिची भेट झाली.