जसप्रीत बुमराह टॉपर! इथं पाहा ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ५ भारतीय गोलंदाजांची कामगिरी

जसप्रीत बुमराहनं बॉर्डर गावकसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत आणखी एका विक्रमाला गवसणी घातली.

जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत अनेक विक्रम प्रस्थापित केले. पाचव्या आणि अखेरच्या सिडनी कसोटी सामन्यात त्याने आणखी एक पराक्रम करून दाखवला.

सिडनी कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात २ विकेट्स घेताच जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियन मैदानात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानावर पोहचला आहे.

भारतीय संघाचे नेतृत्व करताना गोलंदाजीतील आपलं कर्तृत्व दाखवून देत जसप्रीत बुमराहनं ४९ वर्षांचा विक्रम मोडीत काढलाय.

एक नजर बुमराहनं सेट केलल्या रेकॉर्डसह ऑस्ट्रेलियात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या आघाडीच्या ५ भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर

जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या २०२४-२५ च्या हंगामातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत आतापर्यंत ३२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. दुसऱ्या डावात तो आणखी काही विकेट्स आपल्या खात्यात जमा करू शकतो.

बुमराहच्या आधी ऑस्ट्रेलियन मैदानातील एका कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम हा बिशनसिंग बेदी यांच्या नावे होता. आता ते या यादीत ३२ विकेट्ससह दुसऱ्या स्थानी आहेत. १९७७-७८ च्या हंगामात भारतीय दिग्गजाने ही कामगिरी केली होती.

१९७७-७८ च्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत बीएस चंद्रशेखर या भारतीय दिग्गजानं २८ विकेट्स मिळवल्या होत्या.

इरापल्ली प्रसन्ना या भारतीय गोलंदाजानं १९६७-६८ च्या हंगामात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियन मैदानात २५ विकेट्स टिपल्या होत्या.

कपिल देव यांच्या खात्यात ऑस्ट्रेलियन मैदानात २५ विकेट्स मिळवल्याची नोंद आहे. १९९१०९२ च्या हंगामातील कसोटी मालिकेत वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टननं ही कामगिरी नोंदवली होती.