Join us  

Jasprit Bumrah wedding: कोण होणार जसप्रीत बुमराहची नवरी?; टीम इंडियाचा गोलंदाज महाराष्ट्राचा जावई बनणार की साऊथचा?

By स्वदेश घाणेकर | Published: March 05, 2021 2:56 PM

Open in App
1 / 9

भारत-इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटीपूर्वी जसप्रीत बुमराहनं ( Jasprit Bumrah) वैयक्तिक कारण सांगत सुट्टी मागितली. त्याच्या या सुट्टीमागचं कारण हे लग्न असल्याचे वृत्त समोर आले आहे.

2 / 9

जसप्रीत बुमराह या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमना परमेश्वरन ( anupama parameswara ) हिचं नाव सध्या जसप्रीतशी जोडलं जात आहे.

3 / 9

जसप्रीत बुमराह कुणाशी लग्न करणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. तो दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमना परमेश्वरन ( Anupama Parameswaran ) हिच्याशी लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

4 / 9

अनुपमान आणि बुमराह यांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा अनेकदा रंगल्या आणि त्यात बुमराहपाठोपाठ तिनंही सुट्टी घेतल्यानं ही दोघं एकमेकांशी लग्न करणार असल्याची चर्चा पुन्हा रंगली. अनुपमा परमेश्वरन हिनं बुधवारी तिच्या इंस्टा स्टोरीवर फोटो पोस्ट केला अन् राजकोटला जात असल्याचे सांगितले.

5 / 9

पण, आता जसप्रीत बुमराहची होणारी नवरी म्हणून आणखी एक नाव चर्चेत आलं आहे. टीव्ही रिप्रेझेंटेटर संजना गणेसन ( Sanjana Ganesan) हिचं... कोलकाता नाइट रायडर्स फ्रँचायझीसोबत अनेकदा संजना दिसते आणि तिच्या व बुमराहच्या प्रेमाच्या चर्चाही रंगल्या होत्या.

6 / 9

संजना गणेसन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं.

7 / 9

पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं.

8 / 9

9 / 9

याआधी अभिनेत्री राशी खन्ना हिच्यासोबतची बुमराहच्या प्रेमसंबंधाची चर्चा रंगली होती. पण, तिनं या चर्चांवर उत्तर देताना म्हटलेलं की, मला केवळ इतकंच माहितीय की तो एक क्रिकेटपटू आहे. त्याच्यात आणि माझ्यात असे कोणतेही प्रेमसंबंध नाही .

टॅग्स :जसप्रित बुमराहकोलकाता नाईट रायडर्सपुणे