Jasprit Bumrah Sanjana Ganesan Wedding : भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) सोमवारी ( 15 March in Goa) बोहल्यावर चढला. गोव्यात मोजक्याच नातेवाईकांच्या साक्षीनं जसप्रीतनं स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ( Sanjana Ganesan) हिच्याशी लग्न केलं.
भारताचा दिग्गज जलदगती गोलंदाज जवागल श्रीनाथ यानं १९९९ मध्ये ज्योत्सनासोबत लग्न केलं होतं आणि तिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर २००८मध्ये त्यानं पत्रकार माधवी पतरावली हिच्याशी लग्न केलं.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी यानं स्टार स्पोर्ट्स अँकर मयांती लँगरसोबत २०१२मध्ये लग्न केलं आणि गतवर्षी त्यांच्या घरी छोटा पाहूणा आला.
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू बेन कटिंग यानं याच वर्षी चॅनल ७ ची प्रेझेंटर एरिन हॉलंड हिच्याशी लग्न केलं.
न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज मार्टिन गुप्तील यानंही २०१४ मध्ये स्काई स्पोर्ट्स चॅनलची अँकर लॉरा मॅकगोल्ड्रिक हिच्याशी लग्न केलं.
दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज मॉर्ने मॉर्केल यानंही २०१४ मध्ये चॅनल ९ ची अँकर रोज कॅली हिला जीवनसाथी म्हणून निवडले.
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शॉन मार्शनेही २०१४ मध्ये चॅनेल ७ ची अँकर रेबिका ओडोनोव्हॅनशी लग्न केलं.
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन यानंही २०१०मध्ये अँकर ली फरलाँगही लग्न केलं. ती फॉक्स स्पोर्ट्सची अँकर होती.
पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू इम्रान खान यांनी २०१५मध्ये बीबीसीची प्रेझेंटर रेहम खानशी लग्न केलं, परंतु त्यांचा संसार १० महिन्यांचाच राहिला.