Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan: बुमराहची पत्नी T20 World Cup साठी ऑस्ट्रेलियात, चाहते म्हणाले- "भाभी जी..."

दुखापतीमुळे बुमराह यंदाच्या वर्ल्डकपमधून बाहेर

Jasprit Bumrah Wife Sanjana Ganesan: ऑस्ट्रेलियातील T20 World Cup 2022 खेळण्यासाठी टीम इंडिया पोहोचली आहे. भारतीय संघाचे सराव सत्रही पर्थमध्ये सुरू झाले आहे, मात्र यावेळी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघासोबत नाही. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. या दरम्यान, त्याची पत्नी संजना गणेशन ऑस्ट्रेलियाला पोहोचली असून, ती ही स्पर्धा कव्हर करणार आहे.

संजना गणेशनने ऑस्ट्रेलियाला पोहोचताच तो फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ती फ्लाइटमध्ये बसली असून तिने एक मजेदार कॅप्शनही दिले आहे. संजनाने लिहिले आहे की, मी अशा ठिकाणी जात आहे, जे लवकरच माझे सर्वात आवडते ठिकाण बनेल. संजनाचा हा फोटो लाखो लोकांनी लाइक केला आहे.

संजना गणेशनचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. संजना गणेशन सतत आयसीसीसाठी अनेक मुलाखती घेत असतो आणि मोठे कार्यक्रम कव्हर करत असते. यामुळेच ती T20 विश्वचषक कव्हर करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचली आहे.

पण तिचा पती जसप्रीत बुमराहबद्दल बोलायचे झाले तर पाठीच्या दुखापतीमुळे तो T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. बुमराह आशिया कपमध्येही सहभागी झाला नव्हता. त्याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेत पुनरागमन केले होते, पण नंतर पुन्हा एकदा दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर व्हावे लागले.

त्यामुळेच या फोटोमुळे संजना गणेशन ट्रोल झाली आहे. जसप्रीत बुमराह वर्ल्ड कप खेळू शकला नाही, पण संजना मात्र जात आहे, असे चाहत्यांनी कमेंटमध्ये लिहिले आहे. त्यामुळे 'भाभीजी, भाईसाहेब कुठे आहेत,' अशा काही कमेंट्स अनेक चाहत्यांनी दिल्या आहेत. काहींनी तर, 'बुमराहला विसरून आलीस का?', असेही विचारले आहे.

जसप्रीत बुमराहच्या जागी बदली खेळाडूचा पर्याय अद्याप टीम इंडियाने जाहीर केलेले नाही. जसप्रीत बुमराहच्या जागी टीम इंडियामध्ये कोण खेळाडू असेल, याची टी२० विश्वचषकापूर्वी घोषणा केली जाणार आहे. सध्याच्या घडीला त्याच्या जागी मोहम्मद शमीचा मुख्य संघात समावेश केला जाऊ शकतो, असे मानले जात आहे.