जसप्रीत आणि संजना यांनी १५ मार्च २०२१मध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत गोव्यात लग्न केलं. ''प्रेम, जर ते योग्य असेल, तर आपल्याला योग्य मार्ग दाखवतं, आम्ही दोघं नवीन प्रवास सुरू करत आहोत. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आहे आणि या नव्या प्रवासाच्या बातमी तुमच्यासोबत वाटताना आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. हा आनंद तुमच्याशिवाय अपूर्ण आहे,'' असे जसप्रीत बुमराहनं लिहिलं होतं.