Join us  

रवींद्र जडेजाचा डुप्लिकेट पाहिला का?, ऑलराउंडर खेळाडूलाही बसला धक्का; जयदेव उनाडकटने शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2022 3:10 PM

Open in App
1 / 7

सौराष्ट्र क्रिकेट संघाचा कर्णधार जयदेव उनाडकटने अलीकडेच रवींद्र जडेजा सारखा दिसणाऱ्या क्रिकेटरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोने भारताच्या ऑलराउंडर खेळाडूचेही लक्ष वेधून घेतले आणि त्यालाही धक्का बसला. उनाडकटने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून इराणी चषक २०२२ च्या सामन्यादरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो आता क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

2 / 7

जयदेव उनाडकटने ज्या खेळाडूचा फोटो शेअर केला आहे त्याचे नाव प्रेरक मांकड आहे. सामन्यादरम्यान प्रेरकचा फोटो शेअर करत उनाडकटने लिहिले, 'जड्डूला संघात घेऊन आनंद झाला...' उनाडकटच्या ट्विटला उत्तर देताना रवींद्र जडेजाने लिहले, 'हाहाहा...बरेच काही मिळते जुळते आहे.'

3 / 7

सौराष्ट्र संघाचा युवा खेळाडू प्रेरक मांकड याने या वर्षाच्या सुरुवातीला पंजाब किंग्जकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आयपीएलदरम्यान प्रेरकने जडेजासोबतचा एक फोटो त्याच्या इस्टाग्रामवरून शेअर केला होता. या फोटोत देखील जडेजा आणि प्रेरक सारखेच दिसत आहेत.

4 / 7

२३ एप्रिल १९९४ सौराष्ट्र मधील सिरोही येथे जन्मलेला प्रेरक मंकड हा जडेजासारखाच ऑलराउंडर खेळाडू आहे. मंकड रवींद्र जडेजाला सर्वोत्कृष्ट ऑलराउंडर खेळाडू मानतो आणि त्याला देखील जड्डूसारखे खेळायचे आहे. प्रेरकने आयपीएलमध्ये पंजाबकडून फक्त एकच सामना खेळला असून त्याने नाबाद ४ धावा केल्या आहेत. त्याने ३५ टी-२० सामन्यांमध्ये ७६७ धावा केल्या आहेत आणि १० बळी पटकावले आहे.

5 / 7

२८ वर्षीय प्रेरक मांकडने आपल्या प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए कारकिर्दीत चार शतके आणि १९ अर्धशतके झळकावली आहेत. इराणी ट्रॉफी २०२२ मध्ये त्याने सोमवारी शेष भारताविरुद्ध दुसऱ्या डावात ७२ धावा केल्या. प्रेरकने आतापर्यंत ३६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ३३.३८च्या सरासरीने १६६९ धावा केल्या आहेत. त्याने ४३ लिस्ट ए सामन्यांमध्ये ३९.७९च्या सरासरीने १३५३ धावा केल्या आहेत. यासह प्रेरकने प्रथम श्रेणीमध्ये ३५ आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये ३० बळी घेतले आहेत.

6 / 7

खरं तर भारतीय संघाचा स्टार ऑलराउंडर खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. ज्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषकातून माघार घ्यावी लागली. त्याच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाचे मोठे नुकसान झाले आहे. जगातील सर्वोत्कृष्ट फिल्डर म्हणून जड्डूची ख्याती आहे.

7 / 7

रवींद्र जडेजाच्या अनुपस्थित भारतीय संघात अक्षर पटेलला स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत अक्षरने एकूण आठ बळी पटकावले होते. त्याच्या या शानदार कामगिरीमुळे त्याला मालिकावीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

टॅग्स :रवींद्र जडेजाभारतीय क्रिकेट संघसोशल व्हायरलआयपीएल २०२२
Open in App