Most Centuries In 2024 : बाबर सोडा; टॉप ५ मध्ये विराटही दिसेना!

यंदाच्या वर्षात सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या आघाडीच्या फलंदाजात फक्त एक भारतीय, विराटचं नाव गायब

विराट कोहली हा आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या सचिन तेंडुलकरचा पाठलाग करतोय. पण तुम्हाला पटणार नाही या वर्षी (२०२४) सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याच नाव दिसत नाही.

यंदाच्या वर्षी आतापर्यंत सर्वाधिक शतक झळकवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इंग्लंडचा स्टार बॅटर जो रुट अव्वलस्थानी आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात रुटनं १० सामन्यातील १८ डावात ४ शतके झळकावली आहेत.

रुटनंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेच्या कुसल मेंडिसचा नंबर लागतो. १७ सामन्यातील २० डावात त्याने ३ शतके झळकावली आहेत.

श्रीलंकेचा पाथुम निसंका हा देखील आघाडीच्या ५ मध्ये तिसऱ्या स्थानवार आहे. २२ सामन्यातील २३ डावात त्याने ३ शतके झळकावली आहेत.

भारताचा वनडे आणि कसोटी कर्णधार रोहित शर्मानं २० सामन्यातील २५ डावात ३ शतके झळकावली आहेत.

न्यूझीलंडचा स्टार बॅटर केन विलियम्सन १० सामन्यातील १३ डावात ३ शतकासह पाचव्या स्थानावर आहे.