Kamindu Mendis ची क्रिकेटमधील 'डॉन'शी बरोबरी; फास्टर हजारीच्या रेकॉर्ड बूकमध्ये विनोद कांबळीचंही नाव

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा विनोद कांबळी टॉप ५ मध्ये आहे.

श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिस याने न्यूझीलंड विरुद्धच्या गाले कसोटी सामन्यातील मोठ्या खेळीसह क्रिकेटमधील 'डॉन' अर्थात दिग्गज फलंदाज ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी केलीये.

कसोटी पदार्पणानंतर सातत्यपूर्ण कामगिरीसह सलग ८ कसोटी सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करत नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करणाऱ्या मेंडिस यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद हजारीचा टप्पा गाठण्याचा पराक्रम करून दाखवला आहे.

कामिंदू मेंडिस याने १३ डावात कसोटी क्रिकेटमध्ये हजार धावांचा टप्पा पार केला. या कामगिरीसह त्याने थेट डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

ऑस्ट्रेलियन दिग्गज डॉन ब्रॅडमन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये हजारीचा टप्पा गाठण्यासाठी १३ वेळा बॅटिंग केली होती. अर्थात १३ डावात त्यांनी हा मैलाचा पल्ला गाठला होता.

क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या हर्बर्ट सटक्लिफ या इंग्लंडच्या दिग्गजाने १२ डावात कसोटीत हजारीचा टप्पा गाठला होता.

वेस्ट इंडीजचा दिग्गज क्रिकेटर सर एव्हर्टन वीक्स हे देखील कसोटीत सर्वात जलद हजारीचा टप्पा पार करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आहे. या दिग्गजानेही १२ डावात हा पराक्रम करून दाखवला होता.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद हजार धावसंख्येचा टप्पा गाठणाऱ्या आघाडीच्या ५ फलंदाजांमध्ये भारताच्या विनोद कांबळीचाही समावेश आहे. त्याने १४ डावात हा मैलाचा पल्ला गाठला होता.