Kane Williamson becomes Father: IPL 2022 मधील शेवटच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादला पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात केन विल्यमसनचा समावेश नव्हता.
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार आपल्या दुसऱ्या बाळाच्या जन्माच्या वेळी पत्नीजवळ राहावं या दृष्टीने मायदेशात परतला होता. नुकताच केन विल्यमसन दुसऱ्यांदा बाबा झाला.
२२ मे रोजी केन विल्यमसनने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून घोषणा केली की त्याची जोडीदार सारा रहीमने मुलाला जन्म दिला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
IPL 2022 ची साखळी फेरी संपण्याआधीच विल्यमसन मायदेशी परतला. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादच्या शेवटच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने संघाचे नेतृत्व केले.
केन विल्यमसनने त्याच्या इन्स्टाग्रामवर कुटुंबासह फोटो शेअर केला आणि लिहिले की whnau छोट्या माणसाचे स्वागत आहे.
केन आणि सारा यांचे हे दुसरे अपत्य आहे. याआधी दोघांना मॅगी नावाची मुलगी आहे.