Join us

IPL मधील कामगिरीच्या जोरावर या ५ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात कमबॅकची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 17:39 IST

Open in App
1 / 10

दिल्ली कॅपिटल्सच्या संघात असणाऱ्या करूण नायर याने धमाकेदार कामगिरीसह IPL मध्ये धमाकेदार कमबॅक केले आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ४० चेंडूत ८९ धावांची दमदार खेळी केली.

2 / 10

देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाका केल्यावर आता आयपीलमधील कामगिरीसह पुन्हा टीम इंडियातील आपली दावेदारी भक्कम करताना दिसतोय. इंग्लंड विरुद्धच्या दौऱ्यासाठी त्याला टीम इंडियात संधी मिळू शकते. करुन नायर याने २०१७ मध्ये टीम इंडियाकडून अखेरचा सामना खेळला आहे.

3 / 10

मोहम्मद सिराज याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या संघात स्थान मिळाले नाही. टीम इंडियातून बाहेर पडल्यावर मिळालेल्या ब्रेकमध्ये कठोर मेहनत घेत त्याने आयपीएलमध्ये छाप सोडलीये. ६ सामन्यातील १० विकेट्सह तो पुन्हा टीम इंडियात कमबॅकसाठी सज्ज दिसतोय.

4 / 10

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ३ ते ५ जानेवारी रोजी सिडनी कसोटीत सिराज भारतीय संघाकडून शेवटचा सामना खेळला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून वगळल्यावर तो अधिक घातक गोलंदाजीसह मैदानात उतरल्याचे दिसते.

5 / 10

२०२३ मध्ये टीम इंडियात वनडे पदार्पणाची संधी मिळालेल्या साई सुदर्शन याने २०२४ मध्ये टी-२० संघातही स्थान मिळवले. पण त्यानंतर तो संघाबाहेर झाला.

6 / 10

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स संघाकडून धमाकेदार कामगिरीसह त्याने टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी दावेदारी ठोकल्याचे दिसते. साईनं ७ जुलै २०२४ रोजी टीम इंडियाकडून अखेरचा टी-२० सामना खेळला होता.

7 / 10

आयपीएलमध्ये 'अनसोल्ड' राहिलेल्या शार्दुल ठाकूरला लखनौच्या संघाने शेवटच्या क्षणी संघात सामील करून घेतले. त्याने आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवत पुन्हा एकदा टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला आहे.

8 / 10

आयपीएल स्पर्धेनंतर होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यावर त्याला टीम इंडियात संधी मिळू शकते. २६ डिसेंबर २०२३ रोजी शार्दुल ठाकूरनं टीम इंडियाकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

9 / 10

दुखापतीमुळे टीम इंडियातून 'आउट' झालेला रियान परागलाही आयपीएलमधील लक्षवेधी कामगिरी करुन पुन्हा टीम इंडियात कमबॅ करण्याची संधी आहे.

10 / 10

१२ ऑक्टोबर २०२४ रोजी बांगलादेशविरुद्ध रियान परागने टीम इंडियाकडून अखेरचा टी-२० सामना खेळला होता.

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५भारतीय क्रिकेट संघबीसीसीआयमोहम्मद सिराजशार्दुल ठाकूर