Cricket Buzz»फोटो गॅलरी »Kavya Maran IPL 2024: काव्या मारनच्या एका निर्णयाने कमाल केली; SRHने तगड्या संघांना पराभवाची धूळ चारली!Kavya Maran IPL 2024: काव्या मारनच्या एका निर्णयाने कमाल केली; SRHने तगड्या संघांना पराभवाची धूळ चारली! By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 9:12 AMOpen in App1 / 7Kavya Maran SRH: महेंद्रसिंग धोनीची चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रोहित शर्माची मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या दोन्ही संघांकडे मिळून एकूण दहा विजेतेपदे आहेत. परंतु IPL 2024 मध्ये काव्या मारनने घेतलेल्या एका निर्णयामुळे या दोघांचेही संघ हतबल झाल्याचे दिसतात.2 / 7SRHची मालकीण काव्या मारन हिच्या निर्णयाचा थेट परिणाम CSK आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांवर झाल्याचे दिसून आले आहे. तो निर्णय IPLच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महाग खेळाडू आणि सर्वात महाग कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्याशी जोडलेला आहे.3 / 7काव्या मारनचा हा निर्णय म्हणजे SRHचा कर्णधार बदलणे. काव्या मारनच्या पसंतीनुसार यंदा SRHचे कर्णधारपद एडन मार्करम कडून काढून घेत पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आले, ज्याचा परिणाम मैदानात स्पष्टपणे दिसून येत आहे.4 / 7कमिन्सच्या नेतृत्वातील SRHच्या झंजावाताचा फटका आधी मुंबई इंडियन्सला आणि नंतर चेन्नई सुपर किंग्जला बसला. कमिन्सला IPL 2024च्या लिलावात SRHने 20.50 कोटींच्या मोठ्या बोलीवर संघात घेतले आणि त्या निर्णयाला कमिन्स पूर्ण न्याय देत आहे.5 / 7पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबादच्या संघाने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स समोर IPL मधील सर्वात मोठी धावसंख्या म्हणजेच 277 धावांचा डोंगर उभारला, जो मुंबई इंडियन्सला पार करता आला नाही.6 / 7त्यानंतर शुक्रवारी CSKच्या संघासमोरही SRHने दणकेबाज खेळी करून 166 धावांचा पल्ला पार केला आणि आपला धडाकेबाज अंदाज दाखवून दिला.7 / 7IPL 2024 मध्ये पॅट कमिन्सची गोलंदाजी चांगली होत आहे. तसेच कर्णधार म्हणूनही तो आपली कामगिरी चोख बजावत आहे. त्यामुळे आता काव्या मारनचा हा नवा शिलेदार SRHला विजेतेपद जिंकून देतो का, याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications