इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल 2020) 13वा मोसम संयुक्त अरब अमिराती येथे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. त्यासाठी या आठवड्यात 8 फ्रँचायझी खेळाडूंसह युएईत दाखल होतील.
पुढील तीन महिने दुबई आणि अबु धाबी येथे फ्रँचायझी आणि बीसीसीआयचा बेस कॅम्प असणार आहे. आयपीएलचे काही सामने शाहजाह येथे होणार आहेत, परंतु एकाही फ्रँचायझीनं तिथे राहण्याची उत्सुकता दाखवली नाही.
आता तीन महिने युएईत राहायचे म्हटले, तर खेळाडूंसाठी सर्व सुविधांची पूर्तता करणेही गरजेचे आहे. सर्व संघ अबु धाबी आणि दुबई येथील 7 आलिशान हॉटेल्समध्ये राहणार आहेत आणि त्यापैकी अनेकांनी समुद्र किनारी असलेल्या हॉटेल्सना पसंती दर्शवली आहे. दुबईतील ओबेरॉय हे बीसीसीआयसाठीचे अधिकृत हॉटेल आहे.
यूएईत प्रथम दाखल होण्याचा मान किंग्स इलेव्हन पंजाबनं पटकावला. गुरुवारी त्यांचे खेळाडू दुबईत दाखल झाले.
लोकेश राहुल याच्या नेतृत्वाखाली किंग्स इलेव्हन पंजाब यंदाचा आयपीएल जिंकण्याच्या निर्धारानं मैदानावर उतरणार आहे. अनील कुंबळे मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसतील.
किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ दुबईतील सोफिटेल दी पाल्म येथे राहणार आहे, असे वृत्त inside cricketने प्रसिद्ध केलं होतं.
आयपीएल 2020च्या लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाबने ग्लेन मॅक्सवेल (10.75 कोटी), शेल्डन कोट्रेल (8.50 कोटी), दीपक हूडा (50 लाख), इशान पोरेल ( 20 लाख), रवी बिश्नोई (2 कोटी), ख्रिस जॉर्डन (3 कोटी), तजींदर ढिल्लोन (30 लाख) आणि सिम्रन सिंग ( 55 लाख) यांना खरेदी केले.
किंग्स इलेव्हन पंजाब - ख्रिस गेल, मोहम्मग शमी, के गोवथम, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, मुजीब उर रहमान, निकोलस पूरण, करूण नायर, अर्षदीप सिंग, सर्फराज खान, हार्डस विलजोन, मनदीप सिंग, एम अश्विन, जे सुचिथ, हरप्रीत ब्रार, दर्शन नळकांडे, ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कोट्रेल, दीपक हुडा, जेम्स निशॅम, रवी बिश्नोई, इशान पोरेल, ख्रिस जॉर्डन, तरजींदर ढिल्लोन, प्रभसिमरन सिंग.
याशिवाय जाँटी ऱ्होड्स, वासीम जाफर, चार्ल लँगव्हेल्ड आदीं त्यांच्या प्रशिक्षक स्टाफमध्ये आहेत.