Join us  

KKR vs KXIP Latest News : किंग्स इलेव्हन पंजाबनं सामना कुठे गमावला? KKRचा प्रसिध कृष्णा ठरला 'गेम चेंजर'!

By स्वदेश घाणेकर | Published: October 10, 2020 8:39 PM

Open in App
1 / 12

Indian Premier League ( IPL 2020) मध्ये कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यातल्या सामन्यात दिनेश कार्तिकच्या जलद अर्धशतकानं रंगत वाढवली. चेन्नई सुपर किंग्सवर ( CSK) अऩपेक्षित विजय नोंदवणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सनं ( KKR) आजही अनपेक्षितच विजय मिळवला.

2 / 12

लोकेश राहुल ( KL Rahul) आणि मयांक अग्रवाल ( Mayank Agarwal) यांनी 115 धावांची भागीदारी करताना KKRला पराभवाच्या छायेत टाकले होते. पण, दिनेश कार्तिकनं पुन्हा त्याच्या गोलंदाजांचा कल्पकतेनं वापर करून घेतला अन् दोन धावांनी सामना जिंकला.

3 / 12

CSKविरुद्धच्या विजयातील नायक राहुल त्रिपाठीचा तिसऱ्याच षटकात मोहम्मद शमीनं त्रिफळा उडवला. पुढच्याच षटकात नितिश राणा आणि शुबमन गिल यांच्यातील सावळा गोंधळ पाहायला मिळाला. निकोलस पूरननं राणाला धावबाद करून माघारी पाठवले. मॉर्गन आणि गिल यांनी KKRचा डाव सावरला. त्यांची 49 धावांची भागीदारी रवी बिश्नोईनं संपुष्टात आणली. मॉर्गन 24 धावांत माघारी परतला.

4 / 12

गिल एका बाजूनं KKRचा डाव सांभाळून होता आणि कार्तिकनं त्याला साथ दिली. गिल-कार्तिकची 82 धावांची भागीदारी 18व्या षटकात संपुष्टात आली. गिल 57 धावांवर धावबाद झाला. कार्तिकनं 29 चेंडूंत 58 धावा केल्या. कोलकाताला 6 बाद 164 धावांवर समाधान मानावे लागले.

5 / 12

प्रत्युत्तरात उतरलेल्या KXIP ला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला असला, परंतु घडलं वेगळंच. KXIPला रोखण्यासाठी मैदानावर उतरलेल्या KKRला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला. आंद्रे रसेलच्या ( Andre Russell) हातून लोकेश राहुलचा सोपा झेल सुटला. त्यानंतर चौकारही त्याला अडवता आला नाही आणि या प्रयत्नात त्यानं स्वतःला दुखापतग्रस्त करून घेतलं.

6 / 12

एक जीवदान मिळाल्यानंतर राहुलनं संयमी खेळ केला. राहुल-मयांक अग्रवाल या जोडीनं KKRच्या गोलंदाजांना यश मिळवूच दिले नाही. दोघांनी वैयक्तिक अर्धशतकांसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. 15 व्या षटकात KKRला पहिले यश मिळाले. प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर मयांक अग्रवाल झेलबाद झाला.

7 / 12

मयांकनं 39 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकारासह 56 धावा केल्या. मयांक-राहुलनं पहिल्या विकेटसाठी 115 धावा जोडल्या. त्यांच्या या खेळीनं KXIPचा विजय पक्काच केला होता, पण अखेरच्या षटकांत KXIPला धक्के बसल्यानं सामन्याची चुरस कायम राहिली.

8 / 12

प्रसिध कृष्णानं 19व्या षटकात KXIPला दोन धक्के दिले आणि तिथेच सामना फिरला. त्यात 74 धावा करणाऱ्या लोकेश राहुलचाही समावेश होता.

9 / 12

पंजाबला अखेरच्या 12 चेंडूंत विजयासाठी 20 धावा हव्या होत्या आणि त्याचे 8 फलंदाज खेळपट्टीवर होते. पण, प्रसिधनं आधी प्रभसिमरन सिंग आणि लोकेश राहुल यांना बाद केले. त्यानं त्या षटकात केवळ 6 धावा दिल्या.

10 / 12

अखेरच्या षटकात 14 धावांची गरज असताना कार्तिकनं चेंडू सुनील नरीनकडे सोपवला अन् सर्व अनुभव पणाला लावला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 7 धावांची गरज असताना ग्लेन मॅक्सवेलनं उत्तुंग फटका मारला, परंतु इंचाच्या फरकानं चेंडू सीमारेषे आत पडला. पंजाबला चार धावांवर समाधान मानावे लागले.

11 / 12

12 / 12

टॅग्स :IPL 2020कोलकाता नाईट रायडर्सकिंग्स इलेव्हन पंजाब