Join us  

IND vs AUS: संघासाठी काय पण! पहिल्या 'कसोटी'पूर्वी केएल राहुलचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 2:20 PM

Open in App
1 / 11

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. आगामी कसोटी मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे.

2 / 11

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना या मालिकेत चांगली कामगिरी करावी लागेल. अशा स्थितीत दोन्ही संघासमोर कडवे आव्हान असणार आहे.

3 / 11

4 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे खेळवला जाणार आहे. दरम्यान, भारतीय संघाचा उपकर्णधार लोकेश राहुलने मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला आणि विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

4 / 11

पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असणार याकडे क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याशिवाय शुबमन गिल आणि लोकेश राहुल हे सलामीला खेळणार का याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

5 / 11

भारतीय संघ 3 फिरकीपटूंसह पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरण्याच्या विचारात आहे असे उपकर्णधार राहुलने स्पष्ट केले. खरं तर भारतीय संघात 4 फिरकीपटूंचा समावेश आहे, यातील तिघांमध्ये साजेशी फलंदाजी करण्याची क्षमता आहे.

6 / 11

मात्र, या मुद्द्यावर बोलण्यास लोकेश राहुलने टाळले. टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा खेळतील असे मानले जात आहे. मात्र अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यापैकी एकालाच संधी मिळणार आहे.

7 / 11

पत्रकार परिषदेत बोलताना लोकेश राहुलने एक मोठे विधान करून सर्वांचे लक्ष वेधले. संघाला हवे असेल तर मी मधल्या फळीत फलंदाजी करण्यासाठी तयार असल्याचे राहुलने म्हटले.

8 / 11

खरं तर भारताच्या ताफ्यात 3 सलामीवीर फलंदाज आहेत, यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, शुबमन गिल आणि लोकेश राहुल यांचा समावेश आहे. मात्र, राहुलच्या विधानामुळे गिल आणि रोहित सलामीला येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

9 / 11

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

10 / 11

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), ॲश्टन आगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन.

11 / 11

बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी मास्टरकार्ड ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा नागपुरात 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे तीन कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी मालिका झाल्यानंतर भारतीय संघाच्या घरच्या मालिकेचा शेवट वन डे मालिकेतून होणार आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियालोकेश राहुलशुभमन गिलभारतीय क्रिकेट संघरोहित शर्मा
Open in App