KL Rahul Team India: केएल राहुलची जागा घेण्यास तयार 'हे' प्लेअर्स, केवळ संधीच्या शोधात

केएल राहुलचा फॉर्म टीम इंडियासाठी सध्या डोकेदुखी ठरत आहे.

केएल राहुलचा फॉर्म टीम इंडियासाठी सध्या डोकेदुखी ठरत आहे. टी २० विश्वचषक स्पर्धेतही केएल राहुलला चांगली कामगिरी करता आली नव्हती. तर बांगलादेश दौऱ्यावरही त्याची कामगिरी उत्तम राहिली नव्हती.

सध्या असे अनेक प्लेअर्स आहेत जे केएल राहुलची जागा घेण्यास तयार आहेत. पाहुया कोण आहेत हे खेळाडून जे आपल्या एका संधीच्या शोधात आहेत.

शुभमन गिल : ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी सामन्यादरम्यान रोहित शर्मा पूर्णपणे फिट होऊन मैदानावर पुनरागमन करण्याची शक्यता आहे. अशातच रोहित आणि शुभमन गिल यांची जोडी भारतीय संघासाठी उत्तम ठऑरून शकते. बांगलादेश विरोधातील सामन्यातही त्यानं शतक ठोकलं होतं.

संजू सॅमसन : विकेटकीपर फलंदाज असलेल्या संजू सॅमसनलाही अधिक संधी मिळाली नाही. टी २० सामन्यांमध्ये तो ओपनिंगसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. त्यानं ४ टी २० सामन्यांमध्ये ओपनिंग केली होती. त्यात २६.२५ च्या सरासरीनं १६४.०६ च्या स्ट्राईक रेटनं १०५ धावा केल्या होत्या.

ईशान किशन : टी २० मध्ये सलामीवीर म्हणून KL राहुलच्या जागी ईशान किशन सर्वोत्तम उमेदवार आहे. ईशान किशननं २१ टी-२० सामने खेळले असून त्यात त्याने २९.४५ च्या सरासरीने ५८९ धावा केल्या आहेत. बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इशान किशनने द्विशतक झळकावलं होतं

ऋतुराज गायकवाड : मराठमोळा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड देशांतर्गत क्रिकेट सामन्यांमध्ये सातत्यानं धावा केल्या आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाडनं चार शतकं ठोकली होती. याशिवाय मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्यांनी उत्तम फलंदाजी केली होती. ऋतुराज गायकवाड हा टी २० सामन्यांमध्ये केएल राहुलचा उत्तम पर्याय ठरू शकतो.

पृथ्वी शॉ : २३ वर्षीय पृथ्वी शॉ टी २० मध्ये आणि कसोटी सामन्यात केएल राहुलचा मजबूत पर्याय ठरू शकतो. तो यापूर्वीही टीम इंडियासाठी ओपनर म्हणून खेळला आहे. या सीझनच्या सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.