खरंच धनश्री वर्मानं चहलसोबत चिटिंग केलीये? पहिल्यांदा नव्हे तीन वेळा फसली या 'लफड्यात'

एकदा नव्हे तर तीन वेळा 'लफड्यात' फसली धनश्री; जाणून घ्या सविस्तर

कधीकाळी स्वीट जोडी म्हणून ओळखली जाणारी क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा ही जोडी आता नात्यातील कडवटपणामुळे चर्चेत आहे.

एखाद्या क्रिकेटरच्या वैयक्तिक आयुष्यात जोडीदारासोबतच्या वादामुळे वादळ निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अनेक जोड्या फुटल्या आहेत.

ज्या ज्या वेळी अशा घटना घडल्या त्या त्या वेळी क्रिकेटरला जोडीदारानं धोका दिला, अशी चर्चाही रंगली. धनश्री वर्माला देखील सध्या तिने चहलसोबत चिटिंग केल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर अनेकजण तिला ट्रोल करत आहेत.

धनश्री आधी हार्दिक पांड्यासोबतचं नात तोडून घटस्फोट घेतल्यावर नताशाला नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले होते.

धनश्री वर्मा आणि श्रेयस अय्यर यांचा एक डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. एवढेच नाही तर ही दोघे अनेक कार्यक्रमात एकत्र स्पॉट झाली. हा सीन अनेकांनी वेगळ्या अर्थाने घेतला. धनश्री वर्माच अय्यरसोबत नाव जोडले गेले. ती चहलसोबत चिटिंग करत असल्याची चर्चाही रंगली.

धनश्री वर्मा आणि प्रतीक उतेकर यांच्यातील क्लोजअप सीनही चांगलाच चर्चेत राहिला. लोकप्रिय कोरियोग्राफर प्रतीक उतेकरनं २०२३ मध्ये धनश्री वर्मासोबतचा एक फोटो सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केला होता. दोघांची क्लोजअप फ्रेम पाहून सोशल मीडियावर दोघांचे सूत जुळल्याचे गाणं वाजलं. यावेळीही अनेकांनी धनश्री ही चहलला धोका देतीये, असा आरोप करण्यात आला.

चहलसोबत लग्न बंधनात अडकल्यावर धनश्रीनं सोशल मीडियावरील नावात बदल केला होता. वर्माऐवजी तिने चहल अस आडनाव लावण्याला पसंती दिली. पण दोन वर्षांनी तिने चहल हे नाव हटवून पुन्हा वर्मा हे आडनाव लावलं. यावेळीपासून दोघांच्यात सर्वकाही ठिक नाही, असे चित्र निर्माण झाले अन् दोघांच्यात बिनसल्याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली.