Cricket Buzz»फोटो गॅलरी »रोहित शर्मानं पाडला विक्रमांचा पाऊस; जाणून घ्या एका क्लिकवररोहित शर्मानं पाडला विक्रमांचा पाऊस; जाणून घ्या एका क्लिकवर By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 3:50 PMOpen in App1 / 7भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस हिटमॅन रोहित शर्मानं गाजवला. त्यानं खणखणीत शतकं झळकावून या मालिकेतील तिसऱ्या शतकाची नोंद केली. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. 2 / 7या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 185 धावांची भागीदारी करताना संघाला दोनशेपल्ल्याड पल्ला गाठून दिला. रोहित 164 चेंडूंत 14 चौकार व 4 षटकार खेचून 117, तर अजिंक्य 135 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार खेचून 83 धावांवर खेळत आहे. भारतानं पहिल्या दिवशी 3 बाद 224 धावा केल्या आहेत.3 / 7आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक तीन वेळा 50+ धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत त्यानं गौतम गंभीर ( 2010) आणि मोहम्मद अझरुद्दीन ( 1996) यांच्याशी बरोबरी केली. 4 / 7आयसीसी जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत रोहितने सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजात अव्वल स्थान पटकावलं. त्यानं इंग्लंडच्या बेन स्टोक्सला ( 13) मागे टाकले. रोहितनं 4 डावांत 14 षटकार खेचले आहेत. स्टोक्सने 10 डावांत 13 षटकार खेचले आहेत. त्यानंतर मयांक अग्रवाल ( 8) आणि रवींद्र जडेजा ( 7) यांचा क्रमांक येतो. 5 / 7रोहितनं कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावांचा पल्ला पार केला. एका कसोटी मालिकेत तीन शतकं झळकावणारा रोहित हा दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी सुनील गावस्कर यांनी तीन वेळा अशी कामगिरी केली आहे.6 / 7यंदाच्या कॅलेंडर वर्षातील रोहितचे हे नववे आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. त्यानं या कामगिरीसह सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. तेंडुलकरने 1998 च्या कॅलेंडर वर्षात 9 शतकं झळकावली होती. त्यानंतर ग्रॅमी स्मिथ ( 2005) आणि डेव्हिड वॉर्नर ( 2016) यांनी कॅलेंडर वर्षात नऊ आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली आहे. तेंडुलकरनंतर अशी कामगिरी करणारा रोहित पहिलाच भारतीय सलामीवीर ठरला. 7 / 7या सह त्यानं वर्ल्ड रेकॉर्डचीही नोंद केली. त्यानं एका कसोटी मालिकेत सर्वात जास्त षटकार खेचण्याचा विक्रम नावावर केला. वेस्ट इंडिजच्या शिमरोन हेटमायरनं 2018 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत 15 षटकार खेचले होते. रोहितनं या मालिकेत आतापर्यंत 17 षटकार खेचले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications